ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुट्टीत फिरण्यासाठी अनेक जण निसर्गरम्य, मजेशीर ठिकाण निवडतात. त्या ठिकाणी राहण्यासाठी चांगल्या हॉटेलमध्ये बुकिंग करतात.
सहसा हॉटेल एका दिवसासाठी म्हणजेच 24 तासांसाठी बुक केले जाते.
तुम्ही दुपारी 2 किंवा 7 वाजता चेक-इन करत असाल, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत तुमची खोली रिकामी करावी लागेल. तुम्ही 24 तासांचे भाडे भरता पण तुम्हाला पूर्ण 24 तास खोली मिळत नाही. हॉटेल्सवाले असे का करतात?
हॉटेलमधून दुपारी 12 वाजता चेक-आउटची वेळ ही तर देशभरातील बहुतेक हॉटेल्समध्ये चेक-आउटसाठी हीच वेळ निश्चित आहे. यामागचे कारण म्हणजे हॉटेलमध्ये एकामागून एक ग्राहक येतच असतात.
अशा वेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसाठी रूम स्वच्छ करणे, बेडवरील चादर आणि इतर गोष्टी बदलून नीट करण्यासाठी तसेच आवश्यक सुविधा तयार करण्यासाठी वेळ लागतो.
ग्राहकांच्या सवयी लक्षात घेऊन दुपारी 12 वाजताची वेळ ठरवण्यात आली आहे. सामान्यत: लोक सुट्टीत उशिरापर्यंत झोपतात. त्यांना आरामात उठायला आणि तयार व्हायला दुपारचे 12 वाजतात. त्यामुळे चेकआऊटसाठी सकाळची वेळ ठेवली जात नाही.
निश्चित चेकआउट आणि चेक-इनचा आणखी एक फायदा आहे. अशा प्रकारे हॉटेलच्या सर्व रूम अधिक चांगल्या पद्धतीने वापरल्या जातात. निश्चित टाइममुळे हॉटेल कर्मचार्यांना त्यांच्या सेवासुविधांचे प्रभावीपणे नियोजन करण्यास आणि रूमचे वाटप करण्यास सोपे जाते.
चेक-आउट निश्चित वेळेमुळे हॉटेलच्या मॅनेजमेंट टीमला सर्व गोष्टींचे व्यवस्थापन सुरळीत करता येते, यामुळे नवीन ग्राहक सहजपणे चेक-इन करू शकतात.
ग्राहकांना लॉबीमध्ये ताटकळत उभे राहण्याची गरज लागत नाही. हे हाऊसकीपिंग आणि इतर हॉटेल सेवांसाठी सुसंगत टाइमटेबल तयार करण्यास मदत होते.