Pakistani Richest Beggar : कोण आहे पाकिस्तानचा श्रीमंत भिकारी? संपत्ती जाणून डोळे फिरतील

Pakistani Richest Beggar information in hindi : पाकिस्तानच्या एका श्रीमंत भिकाऱ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या श्रीमंत भिकाऱ्याची संपत्ती जाणून तुमचेही डोळे फिरतील.
कोण आहे पाकिस्तानचा श्रीमंत भिकारी? संपत्ती जाणून डोळे फिरतील
World Richest BeggarSaam TV

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर दिवसेंदिवस ताण वाढू लागला आहे. या शेजारी देशात महागाई प्रचंड वाढली आहे. पाकिस्तानातील नागरिकांना जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही अधिकची किंमत मोजावी लागत आहे. पाकिस्तानी सरकारला कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या देशाकडून कर्ज घ्यावे लागत आहे. दुसरीकडे या देशातील एका भिकारी व्यक्तीची जोरदार चर्चा होत आहे. या भिकारी व्यक्तीची संपत्ती जाणून डोळे फिरतील.

मुलांसाठी खरेदी १ कोटींचा विमा

पाकिस्तानातील या श्रीमंत भिकारीची संपत्ती लाखोंमध्ये आहे. या भिकाऱ्याची मुले चांगल्या शाळेत शिक्षण घेतात. याने मुलांसाठी एक कोटींचा विमा देखील खरेदी केला आहे. फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूने या श्रीमंत भिकाऱ्याची संपत्तीची माहिती प्रसिद्ध केली होती.

कोण आहे पाकिस्तानचा श्रीमंत भिकारी? संपत्ती जाणून डोळे फिरतील
Pakistan Shocking News: अल्पवयीन मुलीचं तब्बल ७२ वर्षीय वृद्धासोबत लग्न;पाकिस्तानमधील धक्कादायक घटना

भिकारी दिवसाला कमावतो १ हजार रुपये

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या भिकाऱ्याचं नाव शौकत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुल्तान शहरात राहतो. पाकिस्तानच्या सर्वोच्च टॅक्स कलेक्शन संस्था फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूच्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये शौकत भिकारी व्यक्तीच्या बँक खात्यात १७ लाख रुपये खात्यात होते. शौकत भीक मागून दिवसाला १००० रुपयांची कमाई करतो.

महागड्या शाळेत शिक्षण घेतात भिकाऱ्याचे मुले

शौकत मुल्तानमधील श्रीमंत भिकारी आहे. त्याचे मुलं मुल्तान शहरातील सर्वात महागड्या शाळेत जातात. शौकतने मुलांसाठी १ कोटींचा विमा खरेदी केला आहे. शौकतने अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या संपत्तीविषयी माहिती दिली आहे.

कोण आहे पाकिस्तानचा श्रीमंत भिकारी? संपत्ती जाणून डोळे फिरतील
Pakistan Viral Video: भारत चंद्रावर पोहचलाय, आमची मुले गटारात पडून मरताहेत; पाकिस्तानी संसदेत भारताचं कौतुक

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानी भिकारी पासपोर्ट घेऊन सौदीला पोहोचतात. तिथे जाऊन मशिदीच्या बाहेर भीक मागतात. या भिकाऱ्यांना सौदीतील स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात भीक देतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com