woman dies of electrocution while washing clothes near sawantwadi Saam Digital
महाराष्ट्र

Sindhudurg : विद्युत वाहिनी तुटून अंगावर पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू, सावंतवाडी तालुक्यातील घटना

Sindhudurg Mahavitran News : वीज वितरणचे तालुका अभियंता येईपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही असा प्रवित्रा बांधा ग्रामस्थांनी घेतला. यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरात गडगेवाडी येथील ओहळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर विद्युत तारा तुटून पडल्याने महिलेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. विद्या वामन बिले (वय ६०) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान मृताच्या वारसांना रोख भरपाई न दिल्यास मृतदेह सावंतवाडी वीज वितरणच्या कार्यालयात नेणार असा इशारा बांधा ग्रामस्थांनी प्रशासनास दिला.

या घटनेनंतर बांदा ग्रामस्थ आक्रमक झाले. या घटनेला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी मयताच्या वारसांना रोख दहा लाख रुपये भरपाई द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

वीज वितरणचे तालुका अभियंता येईपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही असा प्रवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्या नंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी उपसरपंचानं गोळी घातली, तेव्हा पूजा कुठे होती? बँक डिटेल्स अन् कॉल लॉग जप्त, बंगल्याविषयी मोठी माहिती हाती

Highest Railway Station: जगातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन कोणतं? ज्या ठिकाणी श्वास घ्यालाही होतो त्रास

Shreya Bugde : उफ्फ तेरी अदा! श्रेयाचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Rashmika Mandanna Photos : ये लाल इश्क; अनारकली ड्रेसमध्ये रश्मिकाचं हिऱ्यासारखं लखलखतं सौंदर्य

Weak Relationship: नवरा- बायकोमधील या ६ चुकांमुळे नात्याचा होतो शेवट

SCROLL FOR NEXT