Success Story : माळरानावर सीताफळ बाग फुलवत शेतक-याने कमाविले लाखोंचे उत्पन्न

या सीताफळाला तेलंगणा राज्यात मध्ये मोठी मागणी आहे.
nanded farmer earns 2.5 lakh per year from sitaphal garden
nanded farmer earns 2.5 lakh per year from sitaphal gardensaam tv

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

जिद्द आणि चिकाटीच्या बळावर शेतकऱ्याने माळरानावर सीताफळाच्या तीन एकर बागेतून वर्षाकाठी अडीच लाख रुपयाचे उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोकलेगावचे शेतकरी किशन जुन्ने यांनी केलेल्या या यशस्वी प्रयोगाची परिसरात चर्चा होत आहे. (Maharashtra News)

nanded farmer earns 2.5 lakh per year from sitaphal garden
Nagpur News : सरकारच्या 'त्या' निर्णयाच्या निषेर्धात विदर्भातील परमिटरुम, बार आज बंद (पाहा व्हिडिओ)

बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता किशन जुन्ने यांनी आपल्या माळरान जमिनीवर सीताफळ लागवडीचा निर्णय घेतला. 2019 मध्ये त्यांनी माळरानावरील तीन एकरमध्ये बालानगरी जातीचे सीताफळाची रोपे लावली.

गांडूळ खत व शेणखत या सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी ही बाग फुलवली. या सीताफळाला तेलंगणा राज्यात मध्ये मोठी मागणी असून यापासून त्यांना वर्षाकाठी अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्याचबरोबर त्यांनी या माळरानावर पेरू व संत्राची देखील लागवड केली आहे. पेरू आणि संत्रा यामधून देखील या शेतकऱ्याने चागले उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

nanded farmer earns 2.5 lakh per year from sitaphal garden
Jayakwadi Dam : सर्वपक्षीय नेत्यांचा ठरावावर शिक्कामाेर्तब, नगरचे पाणी जायकवाडीला नकाेच

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com