Nagpur News : सरकारच्या 'त्या' निर्णयाच्या निषेर्धात विदर्भातील परमिटरुम, बार आज बंद (पाहा व्हिडिओ)

व्हॅट वाढल्याने सरकारचा महसूल वाढेल असे सरकार म्हणत असले तरी यामुळे अवैध व्यावसायिकांना बळ मिळेल अशी भीती परमीट रुम असाेसिएशनने व्यक्त केली.
raise in vat on liquor permit rooms bar owners protests against maharashtra govt at nagpur
raise in vat on liquor permit rooms bar owners protests against maharashtra govt at nagpursaam tv
Published On

- पराग ढाेबळे

Nagpur News :

रेस्टॉरंट अँड परमिट (बार) रूम असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारकडून लावण्यात आलेल्या वाढीव व्हॅटच्या विरोधात आज (गुरुवार) संविधान चौकात नागपूर जिल्हा रेस्टॉरंट आणि परमिट रूम (बार) असोसिएशनच्या वतीने आंदाेलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील सर्व बार एक दिवस बंद ठेवत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. (Maharashtra News)

raise in vat on liquor permit rooms bar owners protests against maharashtra govt at nagpur
Raju Shetti : साखर कारखानदारांची आज स्वाभिमानी समवेत महत्वपूर्ण बैठक, बोलणी फिस्कटल्यास... राजू शेट्टींचा गंभीर इशारा (पाहा व्हिडिओ)

या आंदाेलनाबाबत (aandolan) साम टीव्हीशी बाेलताना रेस्टॉरंट अँड परमिट (बार) रूम असोसिएशनचे अध्यक्ष राजू जयस्वाल म्हणाले परमीट रुमवर पूर्वी व्हॅट पाच टक्के हाेता. त्यात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. आता व्हॅट हा 10 टक्के झाल्याने व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान हाेत आहे. हा कर वाढल्याने सरकारचा महसूल वाढेल असे सरकार म्हणत असले तरी यामुळे अवैध व्यावसायिकांना बळ मिळेल अशी भीती परमीट रुम असाेसिएशनने व्यक्त केली.

आज विदर्भातील अनेक जिल्ह्यातील बारधारकांनी या आंदाेलनात सहभाग घेतल्याचा दावा पदाधिका-यांनी केला. यावेळी आंदाेलकांनी हातात फलक घेत परमिट रूम (बार) वरील व्हॅट कमी करा अशी घोषणाबाजी केली. दरम्यान असाेसिएशनतर्फे जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास अधिवेशनच्या काळात राज्यातील परमीट रुमधारक एकत्र येऊन आंदोलन करतील असाही इशारा नागपूर रेस्टॉरंट आणि परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष राजू जयस्वाल यांनी सरकारला दिला.

Edited By : Siddharth Latkar

raise in vat on liquor permit rooms bar owners protests against maharashtra govt at nagpur
ACB Traps Sports Officer : 1 लाख 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडाधिकारी अटकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com