Maharashtra local body elections, Supreme Court on OBC reservation @LiveLawIndia
महाराष्ट्र

Local Body Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, आज फैसला होणार?

Supreme Court on Zilla Parishad Elections : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वाढली आहे. अनेक जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिल्याने आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. कोर्टाचा निकाल निवडणुकांच्या भवितव्यावर निर्णायक ठरणार आहे.

Namdeo Kumbhar

  • अनेक जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिल्याने निवडणुकांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झालं आहे.

  • आज सर्वोच्च न्यायालयात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणासंदर्भातील सुनावणी होणार आहे.

  • कोर्टाचा निर्णय बदलला तर आयोगाला प्रभाग रचना आणि आरक्षण पुन्हा करावे लागणार आहे.

  • त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Why Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti elections may be postponed in 2025 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आज सर्वोच्च न्यायालयात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या (Maharashtra local body elections) आरक्षणाची सुनावणी (Supreme Court होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्याविरोधात कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासकराज आहे. कारण, मागील ८ वर्षांपासून नगरपरिषदा, नगरपंचायती, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या नाहीत. सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. पण निवडणुकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग केल्याचे समोर आलेय. अनेक ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाहूयात कोणत्या जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाने 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. (Supreme Court impact on 50% reservation breach in Maharashtra local body elections)

50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण

नंदुरबार 100%

पालघर 93%

गडचिरोली 78%

नाशिक 71%

धुळे 73%

अमरावती 66%

चंद्रपूर 63%

यवतमाळ 59%

अकोला 58%

नागपूर 57%

ठाणे 57%

गोंदिया 57%

वाशिम 56%,

नांदेड 56%

हिंगोली 54%

वर्धा 54%

जळगाव 54%

भंडारा 52%

लातूर 52%

बुलढाणा 52%

आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे नागपूरसह राज्यातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. इच्छूकांना आणखी वेटिंगवरच थांबावे लागणार आहे. राजकीय आरक्षणाच्या मर्यादेवर कोर्ट काय निर्णय घेतेय, त्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. जर कोर्टाकडून आरक्षणाबाबत नवे आदेश दिल्यास आयोगाला पुन्हा एकदा तयारी करावी लागेल. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत आयोगाला नव्याने करावी लागेल. तसे झाल्यास राज्यातील निवडणुका लांबणीवर पडतील, असा अंदाज वर्तवला जातोय.  त्यामुळे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय होते याकडे सर्व राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाणार, तब्येतीची विचारपूस करणार

सरकारचा मोठा निर्णय; शाळा–रुग्णालय परिसरात कुत्रे सोडणाऱ्यांना दंड

'Bigg Boss Marathi'च्या 6 व्या सीझनची घोषणा! रितेश देशमुख की महेश मांजरेकर कोण करणार होस्टिंग? 'या' नावाची तुफान चर्चा

Accident: 'ती' भेट अखेरची ठरली! मित्रांसोबत पार्टी, घराकडे जाताना काळाचा घाला; अपघातात IIM च्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Sambhaji Nagar: धक्कादायक! बनावट कागदपत्रे, सहा महिन्यापासून हॉटेलमध्ये महिलेचे वास्तव्य, पाकिस्तान कनेक्शन झाले उघड

SCROLL FOR NEXT