

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घट नोंदली गेली.
दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता यांसह बहुतेक शहरांमध्ये सोन्याचे भाव कमी.
गेल्या आठवड्यात सोन्याचे दर वाढले होते.
चांदीच्या दरातही प्रति किलो मोठी घट झाली.
Today gold Rate 24K, 22K and 18K gold prices Mumbai Pune (November 24, 2025) : आठवड्याच्या पहिल्या दिवशीच सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात किंचित घट झाल्याची नोंद करण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिक, जलगाव, चेन्नई, कोलकाता, दिल्लीसह देशातील बहुतेक प्रमुख शहरांमध्ये दर कमी झाले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत १,२५,९८० रुपये प्रति १० तोळा इतकी झाली आहे. पुणे, नाशिक मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,२५,८३० रुपये नोंदली गेली आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली होती. आठवड्याच्या सुरूवातीला सोन्याची किंमत वाढली आहे. एका आठवड्यात २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ७६० रूपयांनी वाढ झाली. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ७०० रूपयांनी वाढ झाली होती. या आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. भारताची राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,२५,९८० इतकी आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,१५,४९० रुपये आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत, चेन्नई आणि कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत १,१५,३४० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. तर या शहरात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,२५,८३० रूपये इतकी आहे.
दिल्ली: २४ कॅरेट - ₹१,२५,९८० | २२ कॅरेट - ₹१,१५,४९०
मुंबई: २४ कॅरेट - ₹१,२५,८३० | २२ कॅरेट - ₹1,15,340
अहमदाबाद: २४ कॅरेट - ₹१,२४,०१० | २२ कॅरेट - ₹१,१३,६८०
चेन्नई: २४ कॅरेट - ₹१,२५,८३० | २२ कॅरेट - ₹१,१५,३४०
कोलकाता: 24 कॅरेट - ₹१,२५,८३० | २२ कॅरेट - ₹१,१५,३४०
हैदराबाद: २४ कॅरेट - ₹१,२५,८३० | २२ कॅरेट - ₹१,१५,३४०
जयपूर: २४ कॅरेट - ₹१,२५,९८० | २२ कॅरेट - ₹१,१५,४९०
भोपाळ: २४ कॅरेट - ₹1,24,010 | २२ कॅरेट - ₹१,१३,६८०
लखनौ: २४ कॅरेट - ₹१,२५,९८० | २२ कॅरेट - ₹१,१५,४९०
चंदीगड: २४ कॅरेट - ₹१,२५,९८० | २२ कॅरेट - ₹१,१५,४९०
सोन्याच्या किंमतीप्रमाणे चांदीच्या दरातही मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. सराफा बाजार उघडताच चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. चांदीचे दर प्रति किलो ₹१६३,९०० इतकी झाली आहे. गेलया आठवड्यात चांदीचे दर पाच हजार रूपयांनी घसरले होते. आजही चांदीच्या दरात घसरण झाली. जागतिक बाजारात चांदीच्या वायदा किमती प्रति औंस $४९.५६ वर पोहोचल्या आहेत. याचा परिणाम चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.