Why BJP and Bahujan Mukti Party workers clashed in Badlapur : बदलापुरात निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊन हाणामारी झाली. शहरातील आंबेडकर चौकात भाजपची सभा सुरू असताना, त्याचवेळी बहुजन मुक्ती पार्टीची रॅली जात होती. डीजेच्या आवाजावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. त्याचे रूपांतर बाचाबाची आणि नंतर मारहाणीत झाले. या घटनेनंतर, बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. या प्रकारामुळे बदलापुरातील निवडणूक प्रचारात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन सतर्क झाले आहे. प्रचारावेळी हाणामारीच्या या घटनेनं बदलापुरात निवडणूक प्रचाराला गालबोट लागलय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.