EPFO Set to Raise Salary Cap to ₹25,000 : कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ईपीएफओ वेतन मर्यादा पंधरा हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. हा बदल लागू झाल्यास देशातील एक कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि पीएफच्या सामाजिक सुरक्षेखाली आणता येणार आहे. ही मर्यादा शेवटची २०१४ मध्ये साडेसहा हजारांवरून पंधरा हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती आणि त्यानंतर अकरा वर्षांपासून यात कोणताही बदल झालेला नाही. आता या प्रस्तावित वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्यात मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेत भर पडेल, असे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.