Love Triangle : दोन मित्राचा एकाच मुलीवर जीव, प्रेमाच्या त्रिकोणातून तरूणाची हत्या, महाराष्ट्र हादरला

Muktainagar youth murder Case : जळगावमधील मुक्ताईनगर येथे प्रेमाच्या त्रिकोणातून २६ वर्षीय विशाल गोसावीची निर्घृण हत्या करण्यात आली. दोन मित्र एकाच मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे वाद वाढला आणि आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
Jalgaon love triangle
Police escort the arrested accused linked to the brutal love triangle murder case in Jalgaon.Saam TV Marathi
Published On
Summary
  • प्रेमाच्या त्रिकोणातून विशाल गोसावी या तरुणाची हत्या झाली.

  • आरोपी ऋषीकेश आणि आकाश धनगर या भावांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे वाद वाढून हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न.

  • पोलिसांनी आरोपींची कार जप्त केली असून, न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू.

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Jalgaon murder happened due to a love triangle : महाराष्ट्राला हादरवणारी घटना जळगावमध्ये घडली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने मुक्ताईनगरमध्ये एकच खळबळ उडाली. विशाल गोसावी असे हत्या करण्यात आलेल्या २६ वर्षीय तरुणाचे नाव आहे. विशाल गोसावी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांकडून विशालचा शोध घेतला असता त्याची हत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात आला.

प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या

विशाल गोसावी हा तरुण बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी पोलिसात हरवल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या तक्रारीवरून चौकशी केली. दारू पिताना मित्रासोबत झालेल्या वादातून मित्राने भावाच्या मदतीने तरुणाची हत्या करण्यात आल्याचे आधी समोर आले. पण अधिक सखोल तपास केल्यानंतर प्रेम प्रकरणामुळे हत्या झाल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी दोन संशयीतांना या प्रकरणात ताब्यात घेतले असून चौकशी कऱण्यात येत आहे.

Jalgaon love triangle
२८ वर्षाच्या महिला डॉक्टरने ९ व्या मजल्यावरून उडी मारली, महिन्याभरात होणार होतं लग्न, नेमकं झालं काय?

आरोपीची कार पोलिसांच्या ताब्यात -

दोनजण एकाच मुलीवर एकाच वेळी प्रेम करत होते. प्रेमाचा हा त्रिकोण विशालच्या जिवावर उठला. आरोपीने प्रेम प्रकरणातून भावाला मदतीला घेत विशालची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनेत संशयतांनी वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे. आरोपींना कोर्टात हजर कऱण्यात येणार आहे.

Jalgaon love triangle
Today Gold Rate : सोनं खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव; 24k, 22k च्या दरात मोठा बदल

दोन मित्र एकाच मुलीच्या प्रेमात, अन्...

विशालच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी ऋषीकेश आत्माराम धनगर आणि आकाश आत्माराम धनगर या दोन्ही भावांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी ऋषीकेश आणि विशाल हे दोघे जिवलग मित्र होते. दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढत गेले. याच कारणातून ऋषीकेशने भाऊ आकाश याला हाताशी धरत विशाल याचा काटा काढला. दारू पिल्यानंतर विशाल याला चाकूने भोसकून संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुक्ताईनगर पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

Jalgaon love triangle
Today Gold Rate : सोनं खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव; 24k, 22k च्या दरात मोठा बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com