Shiv Sena Symbol Case saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena Symbol Case: धनुष्यबाण शिंदे गटाकडे राहणार की जाणार? प्रताप सरनाईक काय म्हणाले? Exclusive

Bow and Arrow symbol: शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी साम टीव्हीच्या ‘ब्लॅक अँड व्हाइट’मध्ये सकाळ मिडीयाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याशी बोलताना शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.

Surabhi Jayashree Jagdish

शिवसेना पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह कोणाकडे राहणार, याबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं असून, आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना मानत ‘धनुष्यबाण’ चिन्ह दिलं होतं. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडली आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी साम टीव्हीच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या विशेष कार्यक्रमात सकाळ मिडीयाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याशी संवाद साधताना धनुष्यबाणाच्या मुद्द्यावर शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.

‘त्यांनी बाळासाहेबांचे विचार गोठवले’

धनुष्यबाण शिंदे गटाकडे राहणार की जाणार, यावर बोलताना प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. “दुःख या गोष्टीचं होतंय की, त्यांनी सर्वप्रथम बाळासाहेबांचे विचार गोठवले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दाच त्यांनी संपवून टाकला,” असा आरोप सरनाईक यांनी केला.

कपिल सिब्बल हे मोठे वकील आहेत, मात्र “धनुष्यबाण आम्हाला नाही मिळालं तरी चालेल, पण चिन्ह गोठवा, अशी भूमिका मांडली जातेय. ही काय भावना आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘जनतेचा कौल आमच्यासोबत’

“आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. तर आमचा धनुष्यबाण तुम्ही गोठवा म्हणत आहात. असं सरनाईक म्हणाले. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील कामगिरीचा दाखला देत त्यांनी जनतेचा कौल शिंदे गटाच्या बाजूने असल्याचा दावा केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करण्याची भूमिकाही सरनाईक यांनी स्पष्ट केली. “न्यायालयाने निर्णय दिलेला आम्हाला बंधनकारकच आहे. पण न्यायालयात आतापर्यंत तुम्ही त्यांची बाजू ऐकली. कपिल सिब्बल सारखं तेच तेच बोलत होते. आमची भूमिका मांडल्यानंतर न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला बंधनकारक आहे,” असं ते म्हणाले.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून, ‘धनुष्यबाण’ नेमका कुणाकडे राहणार, याचा फैसला काय होणार याची उत्सुकता वाढलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT