Alisha Khedekar
बाहेर पडण्यापूर्वी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन चेहऱ्यावर लावा आणि गरजेनुसार पुन्हा लावा.
उकाडा आणि घामामुळे त्वचेवर तेलकटपणा वाढतो. दिवसातून दोनदा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा.
ऑक्टोबरच्या उष्णतेत शरीरासोबत त्वचेलाही पाण्याची गरज असते. दिवसभर पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड राहा.
उन्हामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ शकते. त्वचेच्या प्रकारानुसार हलका, नॉन-स्टिकी मॉइश्चरायझर वापरा.
दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर जाणे टाळा. बाहेर पडताना टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करा.
घाम आला म्हणून सतत चेहरा धुतल्याने त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. गरजेनुसारच चेहरा स्वच्छ करा.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा