'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Mira-Bhayandar Jain City : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी “मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी” असे विधान केल्याचे वृत्त आहे. या विधानामुळे स्थानिक राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

शाळेत कांदा-लसूण बंदीच्या वादग्रस्त नियमानंतर आता पुन्हा एकदा भाजपचे आमदार नरेंद्र मेहता विधानामुळे चर्चेत आलेत. मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी असल्याचा दावा नरेंद्र मेहता यांनी केलाय. ठाण्यात दादा गुरुदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त जैन समाजाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या दरम्यान मेहता यांनी वक्तव्य केले आहे. शहराचा आमदार जैन, महापौर जैन आणि तब्बल नऊ नगरसेवकही जैन असल्याचा दाखला देत त्यांनी हे विधान केलंय. विशेष म्हणजे, त्यांच्या मालकीच्या शाळेतील कांदा-लसूण बंदीवरून निर्माण झालेल्या वादातही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवत ‘जे होईल ते बघून घेऊ’, असे ठणकावले आहे. यामुळे मिरा-भाईंदरमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com