Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा आक्रमक, दिल्लीतील पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन

Rahul Gandhi Protest In Delhi: राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केले. एफआयआर दाखल करण्याची मागणी करत आक्रमक झाले.
राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या
Rahul Gandhi Dharna at Parliament Police stationsaam tv
Published On
  • राहुल गांधींचे दिल्लीतील पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन

  • पेलेट गन प्रकरणी राहुल गांधींची एफआयआर दाखल करण्याची मागणी

  • विद्यार्थी आंदोलनातील पेलेट गन वापरावरून राहुल गांधी आक्रमक

  • डीसीपी कार्यालयाबाहेर राहुल गांधींचे ठिय्या आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी प्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पेलेट गनचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्याला भेट दिली आणि डीसीपी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेल्या पेलेट गनबद्दल राहुल गांधी वारंवार प्रश्न उपस्थित करत आहेत. आज या प्रकरणाच्या तपासाची चौकशी करण्यासाठी त्यांनी डीसीपी कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर एफआयआर दाखल करत नसल्यामुळे ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी डीसीपी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.

विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी पेलेट गनचा वापर केला होता. या पेलेट गनमुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या पेलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी साहिल लोचव याला घेऊन राहुल गांधी हे पोलिस ठाण्यात पोहचले. राहुल गांधी यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीबद्दल आणि त्यांनी आतापर्यंत काय कारवाई केली याबद्दल विचारणा केली. जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही, तोपर्यंत आपण घटनास्थळावरून जाणार नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी डीसीपी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.

राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या
Rahul Gandhi : राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; कारवाई थांबवण्याचे हायकोर्टाला आदेश, ईडी-सीबीआयलाही थेट सांगितलं

या प्रकरणी एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत आपण इथेच थांबणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी सुप्रीम कोर्टाने माजी न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती २० जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर आणि देशाच्या इतर भागांमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलिस अत्याचारांच्या आरोपांची चौकशी करणार आहे. नीट पेपर फुटीसह आणि इतर परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले होते आणि त्यांनी आंदोलन करत तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या
Rahul Gandhi: राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, वीर सावरकर प्रकरणाचा खटला रद्द

दरम्यान, २० जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये देशभरातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी पेलेट गनचा वापर केला होता. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. त्यांच्यावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहे. विद्यार्थ्यांवर पेलेट गनच्या वापराबाबत विरोधी पक्ष आक्रमक झाला असून ते अजूनही प्रश्न उपस्थित करत आहे.

राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या
Rahul Gandhi Video: पूरी दाल ही काली है...राहुल गांधींची मोठी घोषणा; मोदी सरकारचं टेन्शन वाढणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com