

राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात दिलासा
राहुल गांधींविरोधातील समन्स सुप्रीम कोर्टाने केले रद्द
लखनऊ कनिष्ठ न्यायालयाने बजावलेले राहुल गांधींचे समन्स रद्द
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. वीर सावरकारांच्या अपमानाशी संबंधित प्रकरणात त्यांना दिलासा देण्यात आला. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाशी संबंधित खटला रद्द केला. सुप्रीम कोर्टाने लखनऊ येथील कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधात बजावलेले समन्स रद्द केले. राहुल गांधी यांच्यावर खटला चालवण्यासाठी आवश्यक कायदेशीर मंजुरी दिली नसल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितल्यानंतर कोर्टाने हा आदेश जारी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश सरकारने खटला चालवण्यासाठी आवश्यक मंजुरी दिली नसल्याचे सुप्रीम कोर्टाला कळवण्यात आले. सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ न्यायालयातील कार्यवाही रद्द केली आणि राहुल गांधी यांना बजावलेले समन्स रद्द केले. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांना विचारले, 'तुम्ही मंजुरी दिली आहे का?' तर नटराज यांनी उत्तर दिले की, राज्य सरकारने मंजुरी दिलेली नाही. यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की, 'मंजुरी आवश्यक आहे, पण ती दिलेली नाही. मंजुरीशिवाय खटला चालू शकत नाही. तुम्ही कायद्याचे पालन केले पाहिजे.'
वीर सावरकारांच्या अपमानाशी संबंधित हे प्रकरण २०२२ च्या भारत जोडो यात्रेदरम्यानचे आहे. ते महाराष्ट्रात राहुल गांधी यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याशी संबंधित आहे. त्यात त्यांनी सावरकरांना 'ब्रिटिशांचे सेवक' म्हटले होते आणि सावरकरांना 'ब्रिटिशांकडून निवृत्तीवेतन मिळत होते' असा दावाही त्यांनी त्यावेळी केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत वकील नृपेंद्र पांडे यांनी याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली. कनिष्ठ न्यायालयाने सुरुवातीला राहुल गांधी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(अ) आणि ५०५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना समन्स बजावले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.