शिवसेना कोणाची सुनावणी सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाने शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांना धाडली नोटिस|VIDEO

Supreme Court Notice To Six Shiv Sena MPs Who Joined Eknath Shinde Camp: शिवसेना कोणाची या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच शिंदेंसोबत गेलेल्या सहा खासदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाने शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील सहा फुटीर खासदारांविरोधात पक्षाने शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहून पक्षादेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे ठाकरे गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील वाद आणखी तापण्याची शक्यता आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या खासदारांमध्ये मुंबई उत्तर-पूर्वचे संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे संजय जाधव, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे आणि धाराशिवचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com