Political News : धाराशिवच्या राजकारणात मोठी उलथापालथ! ठाकरे सेना अन् काँग्रेसच्या १० नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश; विरोधी पक्ष रिकामी

Maharashtra Kalamb Political News : कळंब नगर परिषदेत ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी; शिवसेना ठाकरे गटाच्या ९ आणि काँग्रेसच्या १ नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ.
Devendra Fadnavis Operation Lotus Kalamb News
Devendra Fadnavis Operation Lotus Kalamb NewsSaam tv
Published On
Summary
  • कळंब नगर परिषदेत ‘ऑपरेशन लोटस’

  • तब्बल १० नगरसेवक भाजपमध्ये दाखल

  • भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ९ आणि काँग्रेसचा १ नगरसेवक

  • या पक्षप्रवेशानंतर विरोधी पक्षातील एकही नगरसेवक शिल्लक राहिलेला नाही

कळंब नगर परिषदेत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ऐवजी अखेर ‘ऑपरेशन लोटस’ पार पडले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या स्वीकृत नगरसेवकासह तब्बल दहा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नऊ, तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. या पक्षप्रवेशामुळे कळंब नगर परिषदेत विरोधी पक्षातील एकही नगरसेवक शिल्लक राहिलेला नाही.

विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मोहसीन मिर्झा हेच भाजपमध्ये प्रवेश न केलेले एकमेव नगरसेवक ठरले आहेत. मात्र, सध्या ते परभणीतील ड्रग्ज प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहेत. ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने मोहसीन मिर्झा यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच इतर नगरसेवकांनी भाजपची वाट धरली.

Devendra Fadnavis Operation Lotus Kalamb News
Weather Update : महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा, वाचा A to Z अपडेट्स

या पक्षप्रवेशामुळे कळंबच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा असलेले नगरसेवक थेट भाजपमध्ये गेल्याने भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील या दोघांनाही राजकीय धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Devendra Fadnavis Operation Lotus Kalamb News
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

दरम्यान, नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर आमदार कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया देताना कार्यकर्त्यांना सावध केले. “चुकांमधून धडा घेऊ आणि जे चुकले त्यांना धडा शिकवू,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढील लढा देऊ आणि सर्वसामान्यांचा आवाज बनू, असेही त्यांनी स्पष्ट केले. कळंब नगर परिषदेत विरोधकांची संपूर्ण राजकीय जागा रिकामी झाल्याने आगामी काळात स्थानिक राजकारणात याचे पडसाद कसे उमटतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com