Ladki Bahin Yojana SAAM TV
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधीपर्यंत मिळणार? नेमकी माहिती आली समोर

Ladki Bahin Yojana December Installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्यातील पैसे बँक खात्यात कधी जमा होणार? याची वाट अनेक लाभार्थी महिला बघत आहेत. या योजनेंतर्गत सर्वसमावेशक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

Bhagyashree Kamble

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना जबरदस्त हिट झाली. या योजनेमुळंच महायुतीला जनतेचं मतपेटीतून कौल दिला असं प्रमुख नेते जाहीरपणे बोलू लागलेत. पण ज्या लाडक्या बहिणीनं भरभरून मतांचं दान पेटीत टाकलं, त्या बहिणींना आता सरकार सत्तेत आल्यानंतर डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. यासंदर्भात सोशल मीडिया, राजकीय वर्तुळातून वेगवेगळी माहिती दिली जात असल्यामुळं संभ्रम आहे, पण डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार, याबाबतची नेमकी माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्यातील पैसे बँक खात्यात कधी जमा होणार? याची वाट अनेक लाभार्थी महिला बघत आहेत. या योजनेंतर्गत सर्वसमावेशक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे महिला आणि बाल विकास विभागाचे अधिकारी घरोघरी जाऊन कागदपत्रांची तपासणी करणार आहेत, असे मीडिया रिपोर्ट आहेत. पण तक्रार आल्यानंतरच अशा प्रकारे तपासणी होणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं. दुसरीकडं डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार याबाबतही अधिकाऱ्यांकडून नव्याने माहिती दिली जात आहे.

डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार?

महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनेबाबत अधिक माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यातील मासिक रक्कमेबाबत अनेक अपडेट्स विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून देण्यात आले आहेत. मात्र महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नेमकी माहिती दिली आहे.

महिला व बालविकास मंत्र्यांच्या निवडीनंतर डिसेंबर महिन्यातील मासिक रक्कम खात्यात जमा होईल, असं महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. महायुतीने निवडणूक प्रचारात लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० रुपये करणार असं आश्वासन दिलं होतं. तर नोव्हेंबरपर्यंतची अगाऊ रक्कम खात्यात जमाही केली होती. आता २१०० रुपये किंवा डिसेंबरचा हप्ता कधी आणि किती मिळणार याची प्रतीक्षा लाभार्थी महिलांना आहे. मात्र, डिसेंबरचे पैसे महिला व बालविकास खात्याच्या मंत्र्यांच्या निवडीनंतरच त्यांनी सूचना दिल्यानंतरच जमा होतील किंवा सूचनेनंतर जीआर जारी करण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाऊ शकतो, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

'वाढीव रक्कम डिसेंबर किंवा जानेवारीपासून वितरीत करायची की नाही हे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरवले जाईल. त्यानंतर एक जीआर जारी केला जाईल. शिवाय विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्प जारी करावा लागेल.' त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार की नाहीत हे ठरेल,' असंही संबंधित अधिकाऱ्यानं एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

SCROLL FOR NEXT