
सचिन जाधव, साम टीव्ही
पुणे : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू झाली आहे. अर्जाच्या छाननीत 10 हजार अर्ज अपात्र झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार अर्जदारांना योजनेचा लाभ झाल्याची महिला बालकल्याण विभागाच्या अधिकारी यांनी दिले आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी १५ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाख ११ हजार ३६३ मंजूर करण्यात आले होते. बाकी अर्जाची छाननी बाकी होती. अजूनही १२ हजार अर्जाची छाननी बाकी असल्याची माहिती हाती आली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत. तर जिल्ह्यात ५ हजार ८१४ अर्जमध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आल्याची माहिती हाती आहे. पुणे शहरातून एकूण ६ लाख ८२ हजार ५५ आले. त्यातील जवळपास ६ लाख ६७ हजार ४० अर्ज मंजूर झाले. तर ३ हजार ४९४ अर्ज अपात्र ठरल्याची माहिती आहे.
पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातून सर्वात जास्त लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज आले. ४ लाख १९ हजार ८५९ अर्ज आले आहेत. तर त्यातील एकूण ४ लाख १५ हजार ५१० अर्ज मंजूर करण्यात आले. यातील १ हजार १६६ अर्ज अपात्र ठरले आहेत. पुणे जिल्ह्यात २१ लाख ११ हजार ९४६ अर्ज आले. त्यातील २० लाख ८४ हजार ३६४ अर्ज मंजूर झाले आहेत. तर ९ हजार ८१४ अर्ज अपात्र ठरले. आत्तापर्यंत केवळ दहा हजार अर्ज हे छाननी नाकारले आहेत. अद्याप अर्जांची छाननी सुरू झालेली नाही. तसे शासनाकडून निर्देशही नाहीत. त्यामुळे अर्ज बाद होण्याचे कारण नाही.
सध्या केवळ शिल्लक राहिलेल्या अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे.लाडकी बहिण बाबत सर्व प्रक्रिया सुरू आहेत.लवकरच डिसेंबरचा लाडकी बहीण योजना हफ्ता महिलांना जानेवारीमध्ये मिळेल असही अधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा नवा हप्ता येत्या दोन-तीन दिवसांत येणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हफ्ता कधी मिळणार याची वाट पाहावी लागणार आहे.
एकूण अर्ज - २१,११,९४६
पात्र अर्ज - २०,८४,३६४
कायमचे नाकारलेले अर्ज - ९,८१४
अंशतः नाकारलेले अर्ज - ५,७२४
छाननी न केलेले अर्ज - १२,०४४
आधार जोडणी नसलेले अर्ज - ६९,१७५
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.