Shreya Maskar
लाडकी बहीण योजने अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
बालकल्याण विभागाकडे तक्रार आल्यावर अर्जदारांचे आयडी आणि उत्पन्नाचे दाखले यांसारख्या कागदपत्रांची कडक तपासणी केली जाईल.
अधिकारी घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करतील.
लाभार्थींच्या डेटाची मतदार यादी, कर रेकॉर्ड आणि आधार डेटासोबत पडताळणी करतील.
लाडकी बहीण योजने अंतर्गत कोणी खोटे दावे केले असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जातील.
लाडकी बहीण योजनामध्ये फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे, असं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
तुमच्यासोबत फसवणूक झाल्याची तक्रार तुम्ही नागरिक हेल्पलाइन द्वारे करू शकता.
पात्र महिलांना आर्थिक मदत व्हावी, त्यांना योजनेअंतर्गत पैसे मिळावे, हा यामागचा मुख्य हेतू आहे.