Weather Update Today 14 February 2024  Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert: महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस अन् गारपीटीची शक्यता; वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट...

Maharashtra Weather Today: वसंत ऋतूचे आगमन होताच देशातील हवामानातही बदल होऊ लागला आहे. काही राज्यांमध्ये प्रचंड थंडी, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसासह गारपीट होत आहे.

Satish Daud

Weather Update Today 14 February 2024

वसंत ऋतूचे आगमन होताच देशातील हवामानातही बदल होऊ लागला आहे. काही राज्यांमध्ये प्रचंड थंडी वाढली असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. पुढील काही दिवस हवामानाची अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये आता सूर्यप्रकाश मध्यम झाला असून आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि आसपासच्या परिसरातही हलक्या पावसाचा अंदाज आहे.

हवामान खात्यानुसार, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस होईल. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. (Latest Marathi News)

इतकेच नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये हलका पाऊस आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूतही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंगळवारी (१३ फेब्रुवारी) उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागात हलक्या पावसाची नोंद झाली. पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, तटीय तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका पाऊस झाला. यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाला आहे.

महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. आधीच अवकाळीमुळे विदर्भातील शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यातच हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

SCROLL FOR NEXT