अयोध्येतील भव्य मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे. देशातील कानाकोपऱ्यातून दररोज लाखो भाविक अयोध्येत दाखल होऊन रामलल्लाचं दर्शन घेत आहेत. अशातच महाराष्ट्रातून अयोध्येसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगाराने अयोध्येसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर या आगारातून अयोध्येसाठी एसटी बसेस चालवण्यात येणार आहे. या बसेसची प्रवासी संख्या ४२ इतकी ठेवण्यात आली आहे. (Latest Marathi News)
विशेष बाब म्हणजे या एसटी बसेस भाविकांना अयोध्यासोबत प्रयागराज, वाराणसी काशीचे दर्शन घडवणार आहेत. दर्शनासाठी एसटी केवळ प्रवाशांची ने-आण करणार आहे. प्रवाशांना राहणे, जेवण, नाष्टा, मंदिर पास आदी खर्च स्वत: करावा लागणार आहे.
अयोध्या दर्शनासाठी इच्छूक असणाऱ्या भाविकांना ॲडव्हान्स बुकिंगनुसार एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात सुविधेत प्रवाशांना कोणतीही सवलत नसणार आहे. तिकीट बुकिंग तसेच अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापकांशी संपर्क करावा, असे आवाहन जळगाव एसटी विभागाकडून करण्यात आलं आहे.
१० फेब्रुवारीपासून धुळे आगारातून अयोध्येसाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. अयोध्या येथील राम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना या बसद्वारे वाराणसी आणि प्रयागराज या ठिकाणी देखील जाता येणार आहे. अयोध्येकरता जाण्यासाठी प्रवाशांना ४ हजार ५४५ रुपये इतके भाडे आकारले जाणार असल्याची माहिती धुळे आगाराकडून देण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.