Victims of WCL job scam demand justice outside Akola Police Station after losing lakhs to fraudsters. 
महाराष्ट्र

WCL मध्ये नोकरी लावून देतो, अकोल्यात २५ जणांना कोट्यवधींना गंडवलं, शिंदेंच्या माजी आमदाराच्या नावाने धमक्या

WCL JOB SCAM: शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावाने धमक्या देत असल्याचा बेरोजगार तरुणांसह कुटुंबीयांचे आरोप.. मात्र, बाजोरीयांनी आरोप फेटाळले अन म्हटलं..

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

अकोला : अकोला आणि परिसरातील जवळपास 25 बेरोजगार मुलां-मुलींनी 'वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड' म्हणजे 'WCL'मध्ये नोकरी लावून देतो, म्हणून प्रत्येकी 10 लाख रुपयांनी फसवणूक केलीय. असे एकत्रित कोट्यावधी रुपयांनी नोकरीचं आमिष दाखवून गंडवलंय. या नोकरीसाठी प्रत्येकी 20 लाखांमध्ये व्यवहार ठरवण्यात आला होता. त्यातील प्रत्येकाकडून दहा-दहा लाख रुपये वसूल करण्यात आले. अडीच कोटी रूपये लुबाडले. यासाठी नागपुरातील वासुदेव हालमारे आणि अकोल्यातील दलाल आशुतोष चंगोईवाला यांच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांकडून हे पैसे घेतले गेले.

विशेष म्हणजे, नागपुरात नेत या विद्यार्थ्यांना डमी अधिकाऱ्याची भेट घालून देण्यात आली. आता आठ महिने होऊनही नोकरी न मिळाल्यानंतर पैसे परत मागणाऱ्या लोकांना यातील मध्यस्थ दलाल आशुतोष चंगोईवाला हा शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावाने धमक्या देत असल्याचा आरोप बेरोजगार तरुणांसह कुटुंबीयांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणात अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीसांत चार लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. नागपूरचा वासुदेव हालमारे आणि अकोल्याचा आशुतोष चंगोईवासह त्याच्याच कुटुंबातील 2 इतरांचा समावेश आहे.

गोपाकिशन बाजोरियांनी सर्व आरोप फेटाळले. आशुतोष चंगोईवाला याला ओळखतो खरी मात्र मागील पाच वर्षापासून हा आपल्या संपर्कात नाहीये. तर नागपूरचा वासुदेव हालमारे याला आपण ओळखतच नसल्याचे ते म्हटले. दरम्यान या दोघांनी कुटुंबांयांची फसवणूक केली असेल तर दोघांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिलीय. दरम्यान, 'डब्ल्यूसीएल'मध्ये नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारं एक मोठं रॅकेटच राज्यभरात कार्यरत आहे, अशी शक्यता या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.

या 25 मुला मुलींची झाली फसवणूक

यश गुप्ता, स्वाती ढोरे, समृद्धी पवार, आनंद बोरतने, अक्षय बडगे, अमृता श्रोतरी, राहुल ठाकूर, श्रेयस देशमुख, किरण कोकुलवार, किरण कोकुलवार, कविता सपात्कार, मकरंद व्यवहारे, पराग वाघमारे, श्रद्धा वाघमारे, जानवी चक्रपाणी, मयूर बाचांवरे, राकेश शेलार, अशोक लोडम, जयेश खुलेकर, पूजा इंगळे, दर्शन धोटे, सौरभ तागडे, शिवम बदरके, श्याम कदम, दीक्षा खुलेकर आणि रोशन तायडे रोशन तायडे असे सर्व मुला-मुलींची नोकरीच आमिष दाखवत फसवणूक झालेल्यांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपूरहून आषाढी वारी हुन परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारले अन्नछत्र

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT