mla rajesh tope andolan for water in jayakwadi dam  saam tv
महाराष्ट्र

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात उद्या सोडले जाणार? हस्तक्षेप अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी जायकवाडीचे पाणी साेडण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News :

जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) बुधवारी (ता. 22 नोव्हेंबर) पाणी सोडले जाईल असे आश्वासन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलकांना दिल्यानंतर आमदार राजेश टोपे (mla rajesh tope) यांच्यासह शेतकऱ्यांनी साेमवारी रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथे छेडलेले आंदोलन मागे घेतले. दरम्यान जायकवाडीच्या पाण्यावरुन आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात (Jayakwadi water issue in supreme court) सुनावणी होणार आहे. त्याकडे देखील मराठवाड्यासह नगर, नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Maharashtra News)

जायकवाडीचा पाणीप्रश्न आता चांगलाच पेटलाय. जलसंपदा विभागाने 8.5 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचे आदेश देऊनही पाणी सोडलं जात नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतक-यांपाठाेपाठ नेते मंडळी देखील पाण्यासाठी लढा देताहेत. तर दूसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी जायकवाडीचे पाणी साेडण्याचे आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जालना रस्त्यावर साेमवारी शेतक-यांनी आंदाेलन केले. यावेऴी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेले. आंदाेलकर्ते आमदार राजेश टोपे यांच्यासह कार्यकर्त्यांना सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या ठिकाणी 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस ठाण्याच्या समोरच टोपे आणि शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर रात्री आठ वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलक शांत झाले.

जायकवाडीच्या पाण्यावर आज (मंंगळवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि माजी आ. डॉ. कल्याण काळे यांनी जायकवाडी धरणात नाशिक आणि नगरच्या धरणांमधून पाणी सोडावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल केले आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने ३० ऑक्टोबर २३ रोजीच्या कार्यालयीन आदेशाने उर्ध्व गोदावरी खो-यातील धरण समूहातील जलाशयमधील पाणी पैठण धरणात सोडण्यासाठीचे आदेश पारित केले होते.

त्याअनुषंगाने मराठवाड्याला हक्काचे ८.६ टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. परंतु, अहमदनगर आणि नाशिक जिल्हयातील पुढाऱ्यांनी मराठवाड्याचे हक्काचे पाणी रोखून धरले व पाणी सोडण्याचे आदेश असताना देखील मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवले आहे.

जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येऊ नये व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून संजीवनी (टाकळी) सहकारी साखर कारखाना यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.

या याचिकेला विरोध करण्यासाठी काळे यांनी अडव्हॉकेट प्रसाद जरारे यांच्या वतीने स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याचे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT