nhm contractual workers strike in bhiwandi
nhm contractual workers strike in bhiwandisaam tv

NHM Contract Employees Strike: भिवंडीत एनएचएमच्या कंत्राटी कामगारांचे थाळीनाद आंदोलन

भविष्यात तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीने दिली.
Published on

- फय्याज शेख

Bhiwandi News :

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान याेजनेत मागील वीस ते बावीस वर्षांपासून मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार अल्प मानधना वर काम करीत आहेत. सर्व कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे तोपर्यंत समान काम समान वेतन द्यावे या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. (Maharashtra News)

nhm contractual workers strike in bhiwandi
Mumbai Nashik Highway : गॅस टॅंकरची अडचण... मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक बंद राहणार?

गेले 25 दिवसांपासून आंदोलन सुरू असून राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भिवंडीत उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर थाळीनाद आंदोलन केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आंदोलनात भिवंडी महानगरपालिका, जिल्हा परिषद मध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचारी महिला सहभागी झाल्या होत्या. शासकीय सेवेत सामावून घ्यावे तोपर्यंत समान काम समान वेतन द्यावे या मागणीच्या घोषणांनी आंदाेलकांनी परिसर दणाणून सोडला.

सरकार आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या आश्वासना नंतर ही अंमलबजावणी करीत नसल्याने भविष्यात तीव्र आंदोलन करून आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलक पदाधिकारी सतीश देशपांडे यांनी साम टीव्हीशी बाेलताना सरकारला दिला.

Edited By : Siddharth Latkar

nhm contractual workers strike in bhiwandi
Bhogawati Sahakari Sakhar Karkhana Election Result : काेल्हापुरातील केंद्रावर गाेंधळ, 'भोगावती'ची मतमोजणी थांबली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com