- रणजीत माजगावकर
कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची सुरु असलेली मतमाेजणी वादावादीमुळे काही काळासाठी बंद पडली आहे. सध्या रमणमळ्यातल्या बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी केंद्रावर प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. (Maharashtra News)
कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने 86. 33 टक्के मतदान झाले. आज (साेमवार) याची मतमोजणी रमणमळ्यातल्या बहुउद्देशीय सभागृहात सुरू झाली. काही काळानंतर मतमाेजणी बंद पडली.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार मतमोजणी सुरू असताना मतदार प्रतिनिधींनी मतमोजणी करणाऱ्या यंत्रणेवरच आक्षेप घेतला. महसूल यंत्रणा सत्ताधारीच्या बाजूने असून त्या ठिकाणी मतपत्रिकेत खाडाखोड करत असल्याचा आरोप करण्यात आला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जणू घेरावच घातला की काय असे चित्र हाेते. या मतमोजणी केंद्रावर प्रचंड गोंधळ पाहायला मिळत असून मतदार प्रतिनिधींनी सध्या मतमोजणी प्रक्रिया बंद पाडली. सध्या आक्षेप घेणारे पोलिसांसमोरच मतमोजणी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालताना दिस आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.