Washim News Saamtv
महाराष्ट्र

Washim News: तब्बल १ हजार ४१ किलोमीटरचा सायकल प्रवास; योग शिक्षक राजू डांगे अयोध्येकडे रवाना

Washim Latest News: आरोग्यविषयक जनजागृती करुन आदर्श उपक्रम राबविणारे राजू डांगे हे अयोध्यात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वाशिमच्या पार्डी तांडा येथून रवाना झालेत.

Gangappa Pujari

मनोज जयस्वाल, वाशिम|ता. १ जानेवारी २०२४

Washim News:

आरोग्यविषयक जनजागृती करुन आदर्श उपक्रम राबविणारे राजू डांगे हे अयोध्यात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वाशिमच्या पार्डी तांडा येथून रवाना झालेत. या सोहळ्यासाठी ते सायकलवरुन १ हजार ४१ किलोमीटरचा प्रवास करुन सहभागी होणार आहेत.

अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir Inauguration) पार पडणार आहे. देशभरात या सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी योग शिक्षक राजू डांगे हे सायकलवरुन अयोध्येकडे रवाना झाले आहेत. १ हजार ४१ किलो मिटरचा प्रवास ते सायकलने पुर्ण करणार आहेत.

राजू डांगे हे युवा पिढीला दररोज साईमंदिरात निशुल्क योगा शिकविण्याचा काम करतात. त्यांना निरोप देण्यासाठी वाशिमधील (Washim) युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाल श्रीफळ देवून त्यांना रवाना करण्यात आले. यावेळी जय श्रीराम चा गजर करुन पुढील प्रवासाला निघाले. दर दिवशी १०० किलो मिटर अंतरावर मुक्काम करण्याचा त्याचा निर्धार आहे.

दरम्यान, यापुर्वी ३० जानेवारीला राजू डांगे यांनी हरिव्दार, अयोध्या असा देशभ्रमन करुन चार हजार किलोमीटर अंतराचा प्रवास केला होता. त्यांनी ५५ दिवसांत हा प्रवास पुर्ण केला होता. यावेळी त्यांनी ठिकठिकाणी आरोग्यविषयक जनजागृती करण्याचे काम केले होते. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT