PM Modi News : नरेंद्र मोदी २०२४मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील, ब्रिटनच्या 'द गार्डियन' वृत्तपत्राचा दावा

PM Modi The Gaurdian Colunm : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे. तीन राज्यांतील विजयाने लोकसभा निवडणुकीत विजयाची गॅरंटी स्वत: पंतप्रधान मोदींनी दिली आहे.
PM Modi
PM ModiSaam TV
Published On

PM Narendra Modi :

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहेत. ब्रिटनमधील 'द गार्डियन' वृत्तपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक विशेष कॉलम छापण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४मध्ये पंतप्रधानपदाची हटट्रिक करतील असा दावा करण्यात आला आहे.

द गार्डियनमध्ये म्हटलंय की, राम मंदिराचं उद्घाटन, तीन राज्यांच्या निवडणुकीतील विजयाची हॅटट्रिक यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान तिसऱ्यांदा विराजमान होतील हे जवळपास निश्चित आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील विजयामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला अधिक ताकद व वेग मिळेल, असं द गार्डियनने म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपची ताकद वाढली

हॅना एलिस-पीटरसन यांनी आपल्या लेखात लिहिलं की, गेल्या वर्षी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमधील भाजपच्या विजयाने पक्ष आणखी मजबूत झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे. तीन राज्यांतील विजयाने लोकसभा निवडणुकीत विजयाची गॅरंटी स्वत: पंतप्रधान मोदींनी दिली आहे.

PM Modi
Uddhav Thackeray: राम मंदिराच्या पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं; म्हणाले,"फक्त रामाच्या भक्तांना..."

भाजपच्या हिंदू राष्ट्रवादी अजेंड्यासह पंतप्रधान मोदींची राजकीय ताकद देशातील हिंदू बहुसंख्यांना आकर्षित करत आहे आहे. उत्तरेकडील दाट लोकसंख्येच्या राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींचा प्रभाव आहे. दक्षिण आणि पूर्व भारताच्या काही भागांमध्ये भाजपला प्रादेशिक विरोध मजबूत असला तरी राष्ट्रीय स्तरावर तो कमकुवत म्हणून पाहिला जातो, असंही द गार्डियनमध्ये म्हटलं आहे.

PM Modi
Who is Arvind Panagariya : कोण आहेत वित्त आयोगाचे १६ वे अध्यक्ष झालेले अरविंद पनगढिया?

भाजपचा मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेसने तेलंगणामध्ये विजय प्रस्थापित केला आहे. मात्र सध्या फक्त राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. याशिवाय काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह देखील खूप आहेत.

देशातील अनेक विरोधीपक्षांनी एकत्र येत INDIA आघाडीची स्थापना केली आहे. मात्र इंडिया आघाडीचं देखील अनेक मुद्द्यावर एकमत झालेलं दिसत नाही. मात्र तरी देखील या सर्वांना भाजपविरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार केला तर भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे, असं द गार्डियनमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com