Uddhav Thackeray: राम मंदिराच्या पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं; म्हणाले,"फक्त रामाच्या भक्तांना..."

Chief Priest Ram temple Scolded Uddhav Thackeray: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वत्र आदर होत आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी मोठं काम केलंय. याला राजकारण नाही, तर भक्ती म्हणतात, असं प्रमुख पुजारी म्हणाले आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV
Published On

Chief Priest Ram temple:

राज्यासह संपूर्ण देशभरात राम मंदिरासाठी जल्लोष व्यक्त केला जातोय. अशात महाराष्ट्राच्या राजकारणात राम मंदिरावरून राजकारण तापलेलं दिसतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच मुद्द्यावरून आता राम मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray
Shirdi Saibaba Mandir: नववर्षाच्या स्वागतासाठी साईमंदिर आकर्षक फुलांनी सजले, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

येत्या २२ जानेवारीला राम मंदिराच्या (Ram Mandir) लोकार्पणासाठी फक्त रामाच्या भक्तांना निमंत्रण देण्यात आलं आहे. जे रामाचे भक्त आहे त्यांनाच या सोहळ्याचं निमंत्रण दिलंय, अशा शब्दांत राम मंदिराचे प्रमुख पुजारी अचार्य सत्येंद्र दास यांनी टिकास्त्र सोडलंय.

पुढे एएनआयशी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपवर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करतंय, असं म्हणणं अत्यंच चुकीचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वत्र आदर होत आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी मोठं काम केलंय. याला राजकारण नाही, तर भक्ती म्हणतात, असं प्रमुख पुजारी म्हणाले.

संजय राऊतांवर साधला निशाणा

संजय राऊत म्हणतात की, प्रभु राम देखील भाजपकडून निवडणूक लढतील. मात्र, हे वक्तव्य किती हस्यास्पद आहे, अशी टीका आचार्य सत्येंद्र दास यांनी केली.

काय म्हणाले होते संजय राऊत

उद्धव ठाकरेंना निमंत्रण न दिल्याने संजय राऊतांनी अनेकदा भाजपवर टीका केलीये. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप राजकीय पोळी भाजत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राम यांचा वापर करत आहे, असं टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलं होतं.

Uddhav Thackeray
Jalgaon Crime: वृद्धेला बोलण्यात गुंतवून हातातील सोन्याच्या बांगड्या कापून फरार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com