Shirdi Saibaba Mandir: नववर्षाच्या स्वागतासाठी साईमंदिर आकर्षक फुलांनी सजले, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Shirdi Saibaba Mandir News: नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीतील साईमंदिर भक्ताच्या देगणीतून आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. साईदर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक साईचरणी नतमस्तक होत आहेत.
Shirdi Saibaba Mandir
Shirdi Saibaba MandirSaam Digital
Published On

Shirdi Saibaba Mandir

नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीतील साईमंदिर भक्ताच्या देगणीतून आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. साईदर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक साईचरणी नतमस्तक होत आहेत. नवीन दर्शन कॉम्प्लेक्समुळे साई भक्तांचे दर्शन आणखी सुकर झाले असून सकाळ पासून हजारो साई भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईमंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. नववर्षाच्या स्वागताचा उत्साह शिर्डीत बघायला मिळत असून बंगलोर येथील साईभक्‍तांनी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.. गेल्या सतरा वर्षापासून हे भाविक शिर्डीतील साईमंदिराची सजावट करत असतात. अतीशय सुंदर पद्धतीने फुलांनी केलेल्या सजावटीत ओम साईराम हे नाव आकर्षण ठरत आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेले भाविक दर्शनानंतर समाधान व्यक्त करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shirdi Saibaba Mandir
Washim News: 'धुंदीत नव्हे, शुध्दीत नववर्षाचे स्वागत करा...' वाशिममध्ये NCC विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

शिर्डीत साईबाबा संस्थानने 110 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नविन दर्शन काॉम्लेक्समुळे भाविकांना गर्दीतही आल्हाददायक दर्शन मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले होते. या दर्शनरांगेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. दर्शनासाठी अलोट गर्दी असताना देखील भाविकांना सुलभ दर्शन मिळत आहे.

Shirdi Saibaba Mandir
Jalgaon Corona News : चोपडा शहरात कोरोनाचे २ संशयित; आरोग्य यंत्रणा अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com