मनोज जैस्वाल, वाशिम|ता. ३१ डिसेंबर २०२३
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. तरुणाईमध्ये थर्टी फस्ट आणि नववर्षाच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळत आहे. यासाठी मद्यधुंद पार्ट्या, धागडधिंगाणा घालण्याकडे तरुणाईचा कल असतो. याच पार्श्वभूमीवर धुंदीत नव्हे तर शुध्दीत राहून नववर्ष २०२४ चे स्वागत करा.. असा संदेश देत वाशिममध्ये एनसीसी सैनिकांनी शहरात जनजागृती अभियान व रॅली काढली. या रॅलीला तरुणाईचा उत्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
नवीन वर्षाची (New Year Celibration) सुरुवात आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण आनंदाने उत्साहाने आणि नवीन वर्षाचा संकल्प ठेवून करीत असतो. परंतु ३१ डिसेंबर च्या रात्री अनेक तरुण बेभान होऊन वाहने चालवितात.असे प्रकार टाळण्यासाठी जनजागृतीचा संकल्प घेवून वाशिमच्या (Washim) श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी सैनिकांनी शहरात जनजागृती रॅली काढली.
शहरात ठिकठिकाणी सेल्फी पाँईट, पोस्टर व घोषवाक्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा नारा दिला. या अभियानाचा प्रारंभ श्री बाकलीवाल शाळेतून करण्यात आला. पाटणी चौक, कामगार नाका, रामकृष्ण राठी मार्ग या मार्गाने जनजागृती करत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला हारार्पण करुन रॅलीचा समारोप करण्यात आला.
मार्गात ठिकठिकाणी 'नका खाऊ गुटखा, नका पिऊ बियर, हॅप्पी न्यू ईयर, हॅप्पी न्यू ईयर' असे घोषवाक्य तसेच पोस्टर व सेल्फी पाँईटच्या माध्यमातून लोकांना वाहतुक नियम समजावून सांगण्यात आले. या रॅलीला युवक- युवतींचा उस्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. तसेच या अभियानात ६५ एनसीसी सैनिकांनी सहभाग नोंदविला. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.