Uttar Pradesh News: थंड पाणी प्यायला, मैदानावर कोसळला.. क्रिकेट खेळता खेळता १०वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; काय घडलं?

UP Latest News: प्रिन्स सैनी असे या मुलाचे नाव असून उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथे ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेने मृत मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Uttar Pradesh News
Uttar Pradesh NewsSaamtv
Published On

Uttar Pradesh News:

क्रिकेट खेळता खेळता १०वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधून (Uttar Pradesh) समोर आली आहे. प्रिन्स सैनी असे या मुलाचे नाव असून उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथे ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेने मृत मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजीव सैनी यांचे कुटुंब हसनपुरनगरमधील मोहल्ला कायस्थान येथे राहते. त्यांचा मुलगा प्रिन्स श्रीमती सुखदेवी इंटर कॉलेजमध्ये दहावीचा विद्यार्थी होता. शनिवारी (३०,डिसेंबर) दुपारी तो मित्रांसोबत शहरातील सोहरका रोडवर असलेल्या मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता.

दुपारी खेळताना प्रिन्सला तहान लागली. मैदानावरच बॉटलमधील थंड पाणी प्यायला ज्यानंतर त्याची प्रकृती खालावली आणि तो चक्कर येऊन जमिनीवर पडला. प्रिन्सला बेशुद्धावस्थेत पाहून मित्र घाबरले. माहिती मिळताच कुटुंबीय तेथे पोहोचले. त्यानंतर प्रिन्सला ई-रिक्षाच्या मदतीने खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uttar Pradesh News
Nashik News : भक्ष्य तोंडात पकडून बिबट्याचा मुक्त संचार; सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद 

मात्र डॉक्टरांनी त्याला उपचाराआधीच मृत घोषित केले. प्रिन्सच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्रिन्सला एक भाऊ- बहिण आहे. तो शाळेतही हुशार असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. घटनेनंतर कोणतीही कारवाई न करता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या धक्कादायक घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

Uttar Pradesh News
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे महानगरपालिकेवर नाराज; स्थानिक तक्रारींमुळे आयुक्तांना पाठवली नोटीस

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com