Washim News Saaam Digital
महाराष्ट्र

Washim News : बाप-लेक फवारणीसाठी सकाळी शेतात गेले, सायंकाळी पुतण्या शोधण्यासाठी गेला अन् अनर्थ घडला; विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू

Washim Accident News : वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावात विजेचा धक्का लागून बाप-लेक आणि पुतण्याचा मृत्यू झाला आहे. शेतात पिकावर फवारणीसाठी गेले असताना ही दुर्घटना घडली आहे.

Sandeep Gawade

कोल्हापूरमध्ये विजेच्या धक्क्याने दोघां सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज वाशिम जिल्ह्याती तीन शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावात ही घटना घडली आहे. मृतकांमध्ये बाप-लेक आणि पुतण्याचाही समावेश आहे. वडील अशोक माणिक पवार वय (वय४८ ), मुलगा मारुती अशोक पवार (वय २०) व पुतण्या दत्ता राजू पवार (वय १८)अशी मृतांची नावं आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पवार आणि त्यांचा मुलगा मारुती पिकांवर फवारणीसाठी शेतात गेले होते. मात्र सायंकाळ झाली तर घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी त्याचा पुतण्या दत्ता शिवारत गेला होता. मात्र त्याचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.

शेतात विद्युत तारा तुटून पडल्या होत्या. याची फवारणी करण्यासाठी गेलेल्या बाप लेकाना पल्पना नव्हती. यावेळी त्याचा विद्यु तारांना स्पर्ष झाला आणि विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. सायंकाळ झाली तरी दोघंही घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी पुतण्या शेतात गेला होता. त्याचाही बिजेचा धक्का बसून मृत्यू झाला. या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

आठ दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये शेतात काम करताना दोन सख्या भावांचा मृत्यू झाला होता. तरुण मुलांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आईला हा धक्का सहन झाला नाही आणि ५ दिवसातच त्यांचाही मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात राज्यभर अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Walk Time: दिवसाला किती चालणं शरीरासाठी फायद्याचे ठरेल? वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Shocking : भयंकर! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर टाकले अन् आग लावली, त्यानंतर...

Beed : बीडमध्ये शिंदेंच्या नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हॉट्सअॅप स्टेट्समुळे खळबळ, नेमकं झालं काय?

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर अंबाबाईच्या दर्शनाला; कोल्हापूरमध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग, पाहा VIDEO

Good News! गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत होणार सुरू, इतक्या वेळात पोहचणार, वाचा संभाव्य मार्ग

SCROLL FOR NEXT