Nandurbar RTO : थकीत असलेल्या २८ कोटी रुपयांचा दंड वसुली बाकी; वसुलीसाठी नंदुरबार आरटीओची वाहन फिटनेस तपासणी मोहीम

Nandurbar News : चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर काही वर्षांनी त्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट आरटीओकडून घेणे आवश्यक आहे. मात्र अनेक वाहन धारकांनी हे प्रमाणपत्र घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
Nandurbar RTO
Nandurbar RTOSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात चारचाकी वाहनांचे फिटनेस तपासणे अन् विलंब शुल्क भरण्याबाबत वाहन धारकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. जिल्ह्यात तब्बल २ हजार ७५६ चारचाकी वाहनांनी फिटनेस प्रमाणपत्र घेतलेले नाही. यामुळे या वाहन मालकांकडे तब्बल २८ कोटी रुपयांची फी आणि विलंब शुल्क शिल्लक आहे. यामुळे हि दंडाची रक्कम वसुलीसाठी आरटीओ रस्त्यावर उतरणार आहे. 

Nandurbar RTO
Crop Insurance : नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत साडेसात लाख शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा; योजनेसाठी शेवटचे तीन दिवस

चारचाकी (Nandurbar) वाहन खरेदी केल्यानंतर काही वर्षांनी त्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट आरटीओकडून घेणे आवश्यक आहे. मात्र अनेक वाहन धारकांनी हे प्रमाणपत्र घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. या वाहन मालकांना आरटीओने दंड आकारणी केली होती. मात्र त्याची वसुली अद्याप बाकी आहे. दरम्यान या दंड वसुलीसाठी (Nandurbar RTO) नंदुरबार उपप्रादेशिक विभाग येत्या काही दिवसांत वाहन फिटनेस तपासणी मोहीम सुरू करणार आहे. 

Nandurbar RTO
Nashik News : ३१४ किलो भेसळयुक्त पनीर साठा नष्ट; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नंदुरबार जिल्ह्यात २०१७ ते २०२४ या काळात वाहनाचे फिटनेस करणे आवश्यक असतानाही अडीच हजारांपेक्षा अधिक वाहन धारकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे संबधित वाहनांसाठी फिटनेस शुल्क आणि विलंब शुल्क असे दोन्ही आकारले जाणार आहे. (RTO) सात वर्षांत अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने वाहनांच्या किमतीपेक्षा त्यांच्या दंड आणि विलंब शुल्काची रक्कम ही अधिक झाली असून अशा वाहनधारक दंड कसे भरतील अशा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com