सिन्नर (नाशिक) : भेसळयुक्त पनीर बनवून त्याची विक्री केली जात होती. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती झाल्यानंतर पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली. याठिकाणी असलेला सुमारे ३१४ किलो इतका भेसळयुक्त पनीर नष्ट करत तेथील साहित्य जप्त केले आहे.
नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाला गुप्त माहितीच्या आधारे सिन्नर एमआयडीसी येथे एका दुध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या यशवी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस येथे भेसळयुक्त पनीर बनविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ११ जुलैला सायंकाळी धाड टाकत पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरु असल्याचे आढळले. त्याअनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची तपासणी केली असता त्याठिकाणी पनीर बनवितांना रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर करतांना आढलून आले.
त्यानुसार घटनास्थळी उत्पादित पनीरचा एकूण ३१४ किलो साठा ज्याची किंमत ५३ हजार ३८० रुपये इतकी आहे. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच पनीर बनविण्यासाठी घटनास्थळी असलेल्या रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा साठा देखील जप्त केला. तर भेसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्याने ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.