Varangaon Accident : महामार्गावरील उभ्या ट्रकवर टँकरची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Jalgaon News : भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जाणारा ट्रक नादुरुस्त झाल्याने महामार्गाच्या कडेला उभा होता. यावेळी ट्रक नादुरुस्त असल्याने ते पाहण्यासाठी चालक नदीम नसीम खान (रा. नागपूर) हा ट्रक खाली उतरला होता.
Varangaon Accident
Varangaon AccidentSaam tv
Published On

वरणगाव (जळगाव) : वरणगाव शहराजवळून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर नादुरुस्त ट्रक उभा होता. मात्र मागून भरधाव वेगाने आलेले टँकर आदळून अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहन चालकांचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना ११ जुलैला रात्री दीडच्या सुमारास घडली.

Varangaon Accident
Dharashiv News : रस्त्याचे मोजमाप करताना मजुराचा शॉक लागुन मृत्यू; तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग येथील घटना

भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जाणारा ट्रक नादुरुस्त झाल्याने महामार्गाच्या कडेला उभा होता. यावेळी ट्रक नादुरुस्त असल्याने ते पाहण्यासाठी चालक नदीम नसीम खान (रा. नागपूर) हा ट्रक खाली उतरला होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेला १२ चाकी टँकरने मागून जोरदार धडक दिली. समोरील ट्रक न दिसल्याने चालक कुंभकरण (रा. अमेठी, उत्तर प्रदेश) याने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत टँकरच्या केबिनचा अक्षरश: चुराडा झाला असून, चालक कुंभकरण अडकला होता. 

Varangaon Accident
Crop Insurance : नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत साडेसात लाख शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा; योजनेसाठी शेवटचे तीन दिवस

यावेळी नादुरुस्त ट्रकखाली असलेला नदीम नसीम खान हा देखील दाबला गेला. दोघांना बाहेर काढून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याबाबत पोलिस कर्मचारी सुकराम सावकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत टँकरचालक कुंभकरण याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वरणगाव पोलिस तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com