Boy Died Due To Electric Shock
Boy Died Due To Electric ShockSaam Tv

Thane News: रस्त्यावर पाणी साचल्याने फुटपाथवरुन गेला, अन् अनर्थ घडला; 17 वर्षांच्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

Boy Died Due To Electric Shock: कळव्यातील न्यू शिवाजी नगर (New Shivaji Nagar) परिसरात ही घटना घडली आहे.

Thane News: ठाण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Thane Heavy Rainfall) पडत आहे. या पावसामुळे ठाण्यातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याच्या घटना घडल्या. अशातच रस्त्यावर पाणी साचल्यामुळे फुटपाथवरुन चालत जात असताना वीजेचा धक्का लागून १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. कळव्यातील न्यू शिवाजी नगर (New Shivaji Nagar) परिसरात ही घटना घडली आहे.

Boy Died Due To Electric Shock
Modak Sagar Lake Overflows: मुंबईकरांसाठी खुशखबर! मोडक-सागर तलाव ओसंडून वाहू लागलं...

मिळालेल्या माहितीनुसार, मंदार महेंद्र गौरी असं या मृत मुलाचे नाव आहे. मंदार हा कळवा पूर्वेतील न्यू शिवाजी नगर परिसरात राहत होता. गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे शिवाजीनगर भागामध्ये पाणी साचले होते. रस्त्यावर साचलेले पाणी बघून मंदारने फुटपाथवरून जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याठिकाणावरुन जात असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. मंदारला तात्काळ उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

Boy Died Due To Electric Shock
Vasai-Virar News: वसई-विरारमध्ये दोन ठेकेदारांविरोधात गुन्हे दाखल; डांबराच्या कोटींगचे नमुने तपासणीला पाठवले

महापालिकेच्या स्ट्रीट पोलला लागून असलेल्या केबलचा शॉक लागून मंदारचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मंदारला विजेचा धक्का लागल्यामुळे तो खाली पडला होता. पण स्थानिक नागरिकांना कोणी तरी मद्यपान करुन पडला असेल असे वाटले आणि त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र काही वेळाने हा आपल्याच विभागातील मुलगा मंदार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. विजेचा धक्का लागल्यामुळे मंदारचा जागीच मृत्यू झाला होता.

Boy Died Due To Electric Shock
Borivali News: बोरिवली पोलीस ठाण्यात कैद्याची आत्महत्या; नेमकं कारण काय?

दरम्यान स्थानिकांनी मंदारच्या मृत्यूला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. विद्युत पोलच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर रस्त्यावरील विद्युत पोलवरून तार टाकून विजेची चोरी केलेल्या वायरीचा शॉक लागून या तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा दावा महापालिकेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपासाअंती त्याचा मृत्यू कसा झाला आणि या प्रकरणात नक्की जबाबदार कोण? हे स्पष्ट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com