Modak Sagar Lake Overflows: मुंबईकरांसाठी खुशखबर! मोडक-सागर तलाव ओसंडून वाहू लागलं...

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांसाठी खुशखबर! मोडक-सागर तलाव ओसंडून वाहू लागलं...
Modak Sagar Lake Overflows
Modak Sagar Lake OverflowsSaam Tv
Published On

Modak Sagar Lake Overflows: मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली मुंबई महानगरपालिका दररोज सुमारे ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा गुरूवारी दिनांक २७ जुलै २०२३ रोजी रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला आहे.

यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव भरुन ओसंडून वाहू लागणारा यंदाच्या पावसाळ्यातील चौथा तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Modak Sagar Lake Overflows
Bhima Koregaon Case : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

मोडक-सागर तलाव गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२२ मध्ये १३ जुलै रोजी दुपारी ०१.०४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्यापूर्वी म्हणजेच सन २०२१ मध्ये २२ जुलै रोजी मध्‍यरात्री ०३.२४ वाजता, वर्ष २०२० मध्‍ये १८ ऑगस्‍ट रोजी रात्री ०९.२४ वाजता, वर्ष २०१९ मध्ये २६ जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन २०१८ व २०१७ असे दोन्ही वर्ष हा तलाव १५ जुलै रोजी आणि सन २०१६ मध्ये ०१ ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता. (Latest Marathi News)

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. सर्व तलावांमध्‍ये आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्‍ये ९८,५१३ कोटी लीटर (९,८५,१३० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ६८.०६ टक्‍के एवढा पाणीसाठा आहे.

Modak Sagar Lake Overflows
Interim Bail To Vijay Darda: कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरण! विजय दर्डा यांच्यासह तिघांना जामीन मंजूर

यंदाच्‍या पावसाळयात तुळशी तलाव हा भरून वाहू लागलेला पहिला तलाव ठरला आहे. विहार तलाव आणि तानसा तलाव हे बुधवारी, दिनांक २६ जुलै रोजी भरून वाहू लागले आहेत. तर, काल रात्री उशिरा भरून वाहू लागलेल्‍या मोडक-सागर तलाव हा यंदाच्‍या मोसमातील भरून वाहू लागलेला चौथा तलाव ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com