Bhima Koregaon Case : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

Bhima Koregaon Case : व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Supreme Court Stays Gyanvapi Masjid Survey Latest Update
Supreme Court Stays Gyanvapi Masjid Survey Latest UpdateSAAM TV
Published On

New Delhi : भीमा कोरेगाव हिंसाचार संबंधित एल्गार परिषद प्रकरणात आरोपी व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन्ही आरोपींना सुप्रीम कोर्टाने आजा जामीन मंजूर केला आहे. दोघेही मागीप ५ वर्षांपासून कोठडीत आहेत.

जामीन मंजूर करताना दोघांचेही पासपोर्ट जप्त केले जाणार आहेत. तसेच दोघेही एनआयए अधिकार्‍यांच्या संपर्कात राहतील. व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Supreme Court Stays Gyanvapi Masjid Survey Latest Update
Interim Bail To Vijay Darda: कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरण! विजय दर्डा यांच्यासह तिघांना जामीन मंजूर

गोन्साल्विस आणि फरेरा यांना महाराष्ट्रातून बाहेर जाता येणार नाही, असे निर्देश न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने दिले. दोघेही प्रत्येकी एक मोबाईल वापरतील आणि त्यांचा पत्ता तपास करणाऱ्या एनआयएला सांगतील.

Supreme Court Stays Gyanvapi Masjid Survey Latest Update
Andheri Crime News: पत्नी-पत्नीचे एकांतातील फोटो कॅमेऱ्यात कैद; व्हायरल करण्याची धमकी अन्... पुढे काय घडलं?

गोन्साल्विस आणि फरेरा हे 2018 पासून मुंबईच्या तळोजा कारागृहात बंद आहेत. या दोघांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्याविरोधात गोन्साल्विस आणि फरेरा यांनी सर्वोच्च  न्यायालयात धाव घेतली. यावर शुक्रवारी 28 जुलै न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com