Andheri Crime News: पत्नी-पत्नीचे एकांतातील फोटो कॅमेऱ्यात कैद; व्हायरल करण्याची धमकी अन्... पुढे काय घडलं?

Crime News: सोमवारी ४७ वर्षीय तक्रारदारांना त्यांच्या मोबाईलवर आलेला व्हिडिओ पाहून धक्का बसला.
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv
Published On

सचिन गाड

Andheri News: अंधेरी (Andheri) परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीरा देसाई रोड येथील एका उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या पती-पत्नीचे त्यांच्याच बेडरूममधील एकांतातील क्षण व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागण्याच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

या पती-पत्नीने त्यांच्या लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी घरात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) लावले होते. दुर्दैवाने या सीसीटीव्हीचे फुटेज आरोपींच्या हाती लागले आणि त्यांनी हे खंडणीचं कारस्थान रचलं. आता नेमके हे सीसीटीव्ही फुटेज आरोपींच्या हाती कसे लागले आणि यामागे कोणाचा हात आहे त्याचा आंबोली पोलीस शोध घेत आहेत.

Mumbai News
Palghar Crime News : घरगुती भांडणावरुन नव-याने बायकाेला संपवलं, गुजरातला पळून जाण्याच्या तयारीतील नव-यास अटक

सोमवारी ४७ वर्षीय तक्रारदारांना त्यांच्या मोबाईलवर आलेला व्हिडिओ पाहून धक्का बसला. कारण व्हिडिओ होता त्यांच्याच घरातील बेडरूममधला. ज्यात त्यांचे त्यांच्या पत्नीसोबतचे एकांतातील खाजगी क्षण होते. व्हिडिओ पाठवणाऱ्याने हे व्हिडिओ वायरल न करण्याच्या बदल्यात दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र यावेळी तक्रारदार घाबरले नाहीत त्यांनी थेट अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी भादंवि ३८९ (चोरी), ३८४ (खंडणी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ४३ (ब), ६६ आणि ६६ (ई) कलमंतर्गत गुन्हा दाखल केला. आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर शाबिन शाह,२३ आणि अभिजित उर्फ सुमित गुप्ता, २८ नावाच्या दोघांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Mumbai News
Pune Crime News: लग्नाचे वचन देऊन फसवणूक, ३ अल्पवयीन मुलींवर अत्याचार; दोघांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com