Pune Crime News: लग्नाचे वचन देऊन फसवणूक, ३ अल्पवयीन मुलींवर अत्याचार; दोघांना अटक

Pune Police: याप्रकरणी खडक आणि स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) दोघांना अटक केली आहे.
Swargate Police Station
Swargate Police StationSaam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

Pune News: पुण्यामध्ये अल्पवयीन मुलींना लग्नाचे स्वप्न दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकाच दिवशी पुण्यातील वेगवेगळ्या भागामध्ये पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी खडक आणि स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) दोघांना अटक केली आहे. या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.

Swargate Police Station
Pune Crime News: उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने सावकाराचं भयानक कृत्य, पतीसमोरच केला पत्नीवर अत्याचार, पुण्यातील संतापजनक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये तीन अल्पवयीन मुलींना लग्नाचे वचन देत फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तिन्ही गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुली गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. एका १५ वर्षीय मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपी हा तक्रारदार मुलीचा नातेवाईक आहे. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे वचन देत तिच्यासोबत ऑगस्ट २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान शारीरिक संबंध ठेवले. ही मुलगी ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे.

Swargate Police Station
Pune Crime News: स्वारगेट बसस्थानकात दोन महिला पाहून मनात शंकेची पाल चुकचुकली; चौकशी करताच पोलिसही चक्रावले

दुसरी घटना ही पुण्यातल्या गणेश पेठ परिसरातील आहे. याठिकाणी राहणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीची फसवणूक करत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यात आले होते. पीडित मुलीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाला अटक केली. पीडित तरुणी आणि आरोपी यांची ओळख होती. पीडित मुलीच्या घरी कोणी नसताना एप्रिल महिन्यात तो तिच्या घरी आला. तेव्हा त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते.

Swargate Police Station
Pune Crime News: पाणी भरण्यावरुन वाद, पोटावर लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात; पुण्यातील धक्कादायक घटना

तिसरी घटना पुण्याच्या महंमदवाडी येथे घडली आहे. या ठिकाणी राहणार्‍या एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी २० वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल करणाऱ्या महिलेच्या १५ वर्षीय बहिणीस आरोपीने वेळोवळी लग्नाचे वचन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. दरम्यान या तिन्ही प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com