Pune Crime News: स्वारगेट बसस्थानकात दोन महिला पाहून मनात शंकेची पाल चुकचुकली; चौकशी करताच पोलिसही चक्रावले

Pune Marathi News: महिला पोलिस कर्मचाऱ्यांना काळ्या रंगाचा स्कार्प व हिरव्या रंगाचा स्वेटर परिधान केलेल्या दोन महिला पीएमपी बसस्टॉपजवळ रेंगाळताना दिसून आल्या.
Pune police arrested two women gold chain thieves from Swargate bus stand
Pune police arrested two women gold chain thieves from Swargate bus standSaam TV
Published On

Pune News Today: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील स्वारगेट परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुणे पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांना स्वारगेट बसस्थानकावर साध्या वेशात पाळत ठेवण्यास सांगितले होते.

यादरम्यान, महिला पोलिस (Pune Police) कर्मचाऱ्यांना काळ्या रंगाचा स्कार्प व हिरव्या रंगाचा स्वेटर परिधान केलेल्या दोन महिला पीएमपी बसस्टॉपजवळ रेंगाळताना दिसून आल्या. पोलिसांनी त्यांना पकडून चौकशी केली असता, त्यांनी या ठिकाणाहून तब्बल ८ चोऱ्या केल्याची कबुली दिली.

Pune police arrested two women gold chain thieves from Swargate bus stand
Nanded News: अंगात मस्ती येऊ देऊ नका, एका मिनिटात उतरवू; शिंदे गटाच्या खासदाराची तहसीलदारांना धमकी, VIDEO व्हायरल

पोलिसांनी तातडीने या महिलांना ताब्यात घेतले. करुणानिधी सिद्धराज जिनकेरी (वय २५), श्वेता उर्फ सरिता काशीनाथ पाटील (वय २४, दोघी रा. सोलापूर, मूळ तारफेल गुलबर्गा) अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत.

या दोघींनी महिलांच्या गळ्यातील दागिन्यांना लक्ष करण्यासाठी वेगळीच पद्धत वापरली होती. बसमधून उतरलेल्या तसेच बसस्थानकात असलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने दोघीही नेलकटरच्या सहाय्याने कट करून लंपास (Crime News) करत होत्या.

Pune police arrested two women gold chain thieves from Swargate bus stand
Pune Crime News : पोलिसांना घाबरत नाही म्हणत दहशत माजवली, खाकीची ताकद कळल्यावर चांगलीच जिरली

पोलिसांनी या दोघींकडून ८ गुन्ह्यातील ६ लाख ६० हजार रुपयांचे ९ तोळ्यांचे दागिने जप्त केले आहेत. या दोघींनी गेल्या २ ते ३ महिन्यांमध्ये या चोऱ्या केल्या होत्या. त्या सोलापूरहून पुण्यात चोरीसाठी येत असत. काही दिवसांपूर्वी दोघींनी स्वारगेट एसटी बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या एका पुरुषाची सोनसाखळी अशीच नेलकटरने तोडून चोरली होती.

त्यानंतर त्या गर्दीचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारे चोऱ्या करू लागल्या. तो चोरीचा मुद्देमाल त्यांनी गुलबर्गा येथील एका सराफाला विक्री केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आणखी इतर गुन्ह्यांचा छडा लावून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. अजून कुठे या महिलांनी चोरी आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com