Pune Crime News: पाणी भरण्यावरुन वाद, पोटावर लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात; पुण्यातील धक्कादायक घटना

Pregnant Woman Suffered Miscarriage After Beaten: महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पुण्यामध्ये पाणी भरताना झालेल्या भांडणात एकाने पोटात लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या वाघोलीमध्ये (Wagholi) ही घटना घडली आहे. याप्रकरणी २५ वर्षांच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Pune Crime News
Kalyan News: रस्त्यावर उभ्या जेसीबीला टेम्पोची धडक; टेम्पो चालक जखमी, कल्याण मधील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी ही घटना घडली आहे. वाघोली येथे राहणारी २५ वर्षीय महिला घराजवळील सार्वजनिक नळावर पाणी भरत होती. त्याचवेळी या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या रोहितने नळाखाली लावलेला हंडा बाजुला केला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या महिलेने "माझा नंबर आधी आहे, तू मला पाणी भरु दे. माझे झाल्यानंतर तू पाणी भर" असे सांगितले.

Pune Crime News
Pune Crime News : पोलिसांना घाबरत नाही म्हणत दहशत माजवली, खाकीची ताकद कळल्यावर चांगलीच जिरली

यावरुन रोहितने या महिलेला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्याचे वडिल रवी धोत्रे आणि आई शांताबाई धोत्रे हे देखील घटनास्थळी पोहचले. या दरम्यान रोहितने महिलेच्या कानाखाली मारली. तर रोहितच्या आई -वडिलांनी देखील महिलेला मारहाण केली. त्यानंतर रोहितने या महिलेच्या पोटावर लाथ मारली.

Pune Crime News
Mumbai Fire News: मुंबईच्या उच्चभ्रू लोखंडवाला परिसरातील इमारतीतील घराला आग; अग्निशमन दलाची ५ वाहने घटनास्थळी

मारहाण केल्यामुळे गर्भवती महिला या नळाजवळ खाली पडल्या. त्यामुळे तिच्या पोटात दुखू लागले. घरी जाऊन झोपल्यानंतर महिलेच्या शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे या महिलेला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर डॉक्टरांनी तिचा गर्भपात झाल्याचे सांगितले. या मारहाणीमुळे महिलेचे आई होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

त्यानंतर या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत रोहित आणि त्याची आई शांताबाई धोत्रेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com