Vasai-Virar News: वसई-विरारमध्ये दोन ठेकेदारांविरोधात गुन्हे दाखल; डांबराच्या कोटींगचे नमुने तपासणीला पाठवले

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तसेच वर्सोवा पुलाच्या नवीन मार्गिकवर पडलेल्या खड्यांमुळे अनेक वाहनांचा नुकसान झालं आहे.
Vasai-Virar News
Vasai-Virar NewsSaam Tv
Published On

चेतन इंगळे

Vasai-Virar News Today: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तसेच वर्सोवा पुलाच्या नवीन मार्गिकवर पडलेल्या खड्यांमुळे अनेक वाहनांचा नुकसान झालं आहे. याप्रकरणी खासदार राजेंद्र गावित यांनी एनएचआयच्या अधिकाऱ्यांना संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोन ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

याप्रकरणी महामार्ग प्राधिकरणाने काशिमिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. निकृष्ट कामामुळे महामार्गावर खड्डे पडले असून वाहतूक कोंडीची समस्या आणि अपघात वाढले आहेत, असा ठपका ठेवून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Vasai-Virar News
UP News: पतीच्या हत्येनंतर पत्नीने दिली भयंकर कृत्याची कबुली, आधी बेडला बांधलं अन् मग तुकडे...

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ सध्या अती धोकादायक बनला आहे. या महामार्गावर असलेले खड्डे जीवघेणे आहेत. काही ठिकाणी एक ते दोन फूट खोल खड्डे आहेत. त्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून राहिल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने दुर्घटना घडत आहे. जुन्या वर्सोवा पुलाच्या शेजारी नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरू होते. (Vasai Virar)

या पुलाची एक मार्गिका २८ मार्च रोजी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली होती. अवघ्या तीन महिन्यांतच येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. याबाबत खासदार राजेंद्र गावित महामार्गावरील खड्डे आणि पूलाच्या निकृष्ट कामाबद्दल संताप व्यक्त करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार महामार्ग प्राधिकरणातर्फे सुमितकुमार दलबिर सिंग यांनी दोन ठेकेदार कंपनीसह तिघांवर हे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये त्यानुसार एम. मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक विजय मिस्त्री, यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या महामार्गासाठी वापरण्यात आलेल्या डांबराचे नमुने तपासणी करता पाठवण्यात आल्याचे खासदार गावीत त्यांनी सांगितले.

Vasai-Virar News
Sambhaji Bhide News: महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य, काँग्रेस आक्रमक

२०१८ ते २७ मार्च २०२३ या कालावधीत सूरत ते दहिसर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ येथील वरसावे खाडीपुलावर केलेले काँक्रीटीकरण व डांबरीकरण यामुळे मुंबई- अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे सुरक्षितता धोक्यात आली आहे. यासाठी या तिघांविरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात कलम ३३६, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती काशिमिरा पोलीस (Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी सांगितले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com