UP News: पतीच्या हत्येनंतर पत्नीने दिली भयंकर कृत्याची कबुली, आधी बेडला बांधलं अन् मग तुकडे...

UP News Today: उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेला पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे केल्याचा आरोप या महिलेवर आहे.
Crime News
Crime NewsSaam TV

UP Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेला पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे केल्याचा आरोप या महिलेवर आहे. मुलाने वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि महिलेची चौकशी केली. महिलेने आपला गुन्हा कबूल केला आणि तिनेच आपल्या पतीची हत्या केल्याची कबुली दिली. इतकेच नाही तर तिने आपल्या पतीची हत्या कशी केली हे देखील सांगितले. (Latest Marathi News)

Crime News
BJP Rahul Kul Clean Cheat: भीमा साखर कारखाना घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; भाजप आमदार राहुल कुल यांना क्लिन चीट

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील आहे. राम पाल असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचे वय ५५ वर्षे असल्याचे सांगण्यात आले. राम पाल यांचा मुलगा सोन पाल याने प्रथम आपले वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मुलगा सोन पाल हा त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत वेगळा राहत होता. (Crime News)

राम पाल यांच्या पत्नीचे नाव दुलारो देवी असून ती काही दिवसांपासून पतीच्या मित्रासोबत राहत होती. मुलगा सोन पाल घरी परतल्यावर त्याने आईला वडिलांबद्दल विचारले. यावर दुलारो देवी म्हणाल्या की, तो बेपत्ता झाला आहे. यानंतर मुलाने वडिलांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांना (Police) संशय आल्याने त्यांनी दुलारीदेवीला ताब्यात घेऊन चौकशी केली.

Crime News
Rohit Pawar Met Deputy CM Ajit Pawar: रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट; नेमकं काय झालं? स्वतःच केला खुलासा

दुलारीने चौकशीत पतीची हत्या केल्याचे मान्य केले. तिने सांगितले की तिने तिच्या पतीला बेडला बांधले आणि त्याचे पाच तुकडे केले. तिने गेल्या रविवारी रात्री रामपालची हत्या केली आणि नंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला.

पोलिसांनी जलतरणपटूंच्या मदतीने रामपालच्या शरीराचे अवयव नाल्यातून बाहेर काढले. याशिवाय नाल्यातून मृतांचे रक्ताने माखलेले कपडे देखील सापडल्या आहेत. दुलारीने आपल्या पतीची हत्या का केली याचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com