Rohit Pawar Met Deputy CM Ajit Pawar: रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट; नेमकं काय झालं? स्वतःच केला खुलासा

Rohit Pawar Statement: पण ही भेट प्रशासकीय कामांसाठी असल्याचे रोहित पवार यांनी भेटीनंतर स्पष्ट केले.
Rohit Pawar Met Deputy CM Ajit Pawar
Rohit Pawar Met Deputy CM Ajit PawarSaam tv
Published On

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत रोहित पवार (MLA Rohit Pawar) आणि राष्ट्रवादीचे काही नेते नाराज झाले होते. रोहित पवार यांनी त्यानंतर यासर्व बंडखोर आमदारांना शरद पवारांनी दिलेल्या पदांची जाणीव करत टीका केली होती.

त्यानंतर आता रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट (Rohit Pawar Met Deputy CM Ajit Pawar) घेतली. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर रोहित पवार आणि अजित पवार यांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण ही भेट प्रशासकीय कामांसाठी असल्याचे रोहित पवार यांनी भेटीनंतर स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-जामखेड मतदारसंघातील ‘एमआयडीसी’चा मुद्दा घेऊन रोहित पवार यांनी विधानभवनात अजित पवारांची भेट घेतली. मतदारसंघातील कामासंदर्भात या भेटीदरम्यान चर्चा झाली. एमआयडीसीचा विषय रोहित पवार यांनी लावून धरला होता. त्यानंतर दोघांची भेट महत्वाची मानली जात आहे. अजित पवार आणि रोहित पवार यांनी चर्चेनंतर एकत्र जेवण केले असल्याचे देखील सांगितले जात आहे.

अजित पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'अजितदादा यांच्याकडे ३ ते ४ सामूहिक विषय घेऊन गेलो होतो. सरकारी परीक्षांची 1000 रुपये, 900 फी घेतली जात आहे. राजस्थान पॅटर्न नुसार 600 रुपये घ्यावी यासंदर्भातील त्यांना पत्रं दिलं. मविआ उपमुख्यमंत्री असताना एमपीएससी सदस्य वाढवण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. याबाबत आता आढावा बैठक घ्यावी अशी विनंती मी त्यांच्याकडे केली.'

तसंच, 'काही भरती बाकी राहिल्या आहेत. त्या लवकर कराव्यात अशी मागणी करण्यात आली. माझ्या मतदारसंघातील विषय आणि पीक विमा योजनेसाठी वेळ वाढवा. तसंच माझ्या मतदारसंघातील एमआयडीसी विषय निकाली लावा असे मी त्यांना सांगितले.', असं देखील रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार ३०-३५ आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

यावेळी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे इतर नेते आणि आमदारांच्या निर्णयामुळे रोहित पवार खूपच दुखावले होते. त्यांनी या सर्वांना टार्गेत करत टीका केली होती. अशामध्ये आता त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे सर्वांनी भूवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com