Wardha Triple Vehicle Accident Saam Tv
महाराष्ट्र

Wardha Accident: कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांचा अपघात; उभ्या ट्रकला एकावर एक धडकल्या २ कार; वाहनांचा चेंदामेंदा

Wardha Triple Vehicle Accident: कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात झालाय. हैदराबाद ते प्रयागराज असा ते प्रवास करत होते. हैदराबाद -नागपूर महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला दोन कार धडकल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

नादुरुस्त स्थितीत सिमेंट भरुन असलेल्या ट्रकला मागाहून येणाऱ्या दोन कार धडकल्याची घटना हैद्राबाद ते नागपूर महामार्गावर झालीय. या धडकेत एका कारचा चेंदामेंदा झालाय. या विचित्र अपघातात दोन्ही कारमधील सहा जण जखमी झालेत. हा अपघात हैद्राबाद ते नागपूर महामार्गावर जसापूर शिवारात झाला. या दुर्घटनेत एका कारमधील सात प्रवाशांपैकी आदित्य राज (२०), कल्पना कटरला (२०),रिशिका (२२) सर्व रा. हैदराबाद हे गंभीर जखमी झाले.

तसेच दुसऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरमधील एकूण १२ प्रवाशांपैकी नरसिंह मल (४०), अमरनाथ रेड्डी (५०) दोन्ही रा. जहीराबाद तेलंगणा आणि गणेश अभंग सुरवशे (४२) हे किरकोळ जखमी झालेत. हे सर्व हैदराबाद ते प्रयागराज कुंभमेळ्याला जात होते. ट्रक चालक मोहम्मद अखिल मोहम्मद लल्लू (२१ रा. पडोली चंद्रपूर)हा ट्रकमध्ये सिमेंट भरुन चंद्रपूर ते नागपूर महामार्गाने जात होता.

जसापूर शिवारात ब्रेक डाऊन झाल्याने ट्रक फर्स्ट लेनवर नादुरुस्त स्थितीत उभा होता. हैदराबाद ते प्रयागराज जात असलेल्या कार चालकाला समोरील वाहन दिसून न आल्याने कार थेट नादुरुस्त स्थितीत असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. काही वेळाने मागाहून येणारा टेम्पो ट्रॅव्हलर वाहन प्रयागराज जात असतानाच कार निष्काळजीपणे चालवून अपघातग्रस्त कारवर जाऊन धडकली.

अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळ गाठून हायवे रुग्णवाहिकेने जखमींना समुद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ नेले. पोलिस निरीक्षक संतोष सपाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक भय्याजी ताेडसे, विकास काकडे, रंजीत फाले, प्रदीप डोंगरे, यांनी वाहतूक वळवून अपघातग्रस्त वाहने हायड्राच्या सह्याने सुरक्षित ठिकाणी हलवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

सांगलीच्या पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला असून एसटी बस पुलावरून खाली कोसळल्याने 35 प्रवासी जखमी झालेत. जखमींना तातडीने इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेत. ही एसटी बस साताऱ्यातील दहिवडी आगाराची असून कोल्हापूरच्या जोतिबा डोंगराला जात होती. बस महामार्गावर असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, त्यामुळे बसने पुलाचा कठडा तोडून थेट ओढ्यात कोसळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

SCROLL FOR NEXT