Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : लाईन दुरुस्तीचे काम करताना कामगाराचा मृत्यू; अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने घडली घटना

Wardha News : दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. यामुळे परिसरातील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. यावेळी सौरभ हा खांबावर चढलेला होता. बराच वेळ काम चालले असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाला

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: वीज वितरण कंपनीकडून लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांसह काही कंत्राटी कामगार देखील होती. यात खांबावर चढलेल्या कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या युवकाचा दुरुस्तीचे काम करीत असताना विद्युत प्रवाहाचा झटक्याने मृत्यू झाल्याची घटना वर्धा तालुक्याच्या वायगाव निपानी येथे घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

वर्धा तालुक्यातील वायगाव येथील सौरभ दिलीप शेंडे (वय २८) असे मृत कामगाराचे नाव आहे. सौरभ हा महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीवर कामाला होता. दरम्यान महावितरणकडून वायगाव येथे विद्युत देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. यामुळे परिसरातील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. यावेळी सौरभ हा खांबावर चढलेला होता. बराच वेळ काम चालले असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाला. 

अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने घात 

अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने कामात व्यस्त असलेल्या सौरभला विजेचा जबर झटका बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सोबत असलेले कर्मचारी घाबरले होते. चांगलीच धावपळ उडाली. दुरुस्तीच्या कामादरम्यान सर्व सुरक्षा घेऊन व उपाययोजना करूनच विद्युत दुरुस्तीचे काम सुरू होते. असे असताना विद्युत प्रवाहाचा संचार कसा झाला? हा सध्या तपासाचा विषय आहे; असे वीज वितरणचे शाखा व्यवस्थापक विकी बागडे यांनी सांगितले.

बॅकफिडींग होऊन दुर्घटना 

दरम्यान, संस्कार ऍग्रो कंपनीने जनरेटर चुकीच्या पद्धतीने लाईनशी जोडल्याने बॅकफीडिंग होऊन ही दुर्घटना घडली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे. मृतकाच आज शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. या घटनेनंतर वायगाव येथे नागरिकांमध्ये रोष असल्याची माहिती आहे. मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदतीसह तात्काळ कारवाईची मागणी केली जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चाना उधाण

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT