Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Wardha News : पोलिसांना यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारू येत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारवार पोलिसांनी देवळी येथील आंबेडकरनगर ले आऊट परिसरात छापा टाकला

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दारूबंदी असलेल्या (Wardha) वर्धा जिल्ह्यामध्ये अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून देवळी (Police) पोलीस स्टेशनच्या हद्दीत आंबेडकरनगर लेआउट परिसरात ही कारवाई केली आहे. (Breaking Marathi News)

पोलिसांना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारू येत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारवार पोलिसांनी देवळी येथील आंबेडकरनगर ले आऊट परिसरात छापा टाकला. यावेळी एक व्यक्ती कारमधून (Liquor) दारूसाठा घेऊन जात असताना आढळून आला. भीमजय नरेंद्र म्हैसकर (वय ४०) असे या इसमाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता त्याने कळंब येथील बारमधून दारू आणल्याचे सांगितले. याप्रकरणी बार मालक मनीष जयस्वाल, कृष्णा जयस्वाल (दोन्ही रा. कळंब) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर त्याच्या ताब्यातून कार तसेच दारूने भरलेल्या २५ खोक्यांतून १ हजार २०० बाटल्या असा ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयिताला देवळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर, रोशन निंबोळकर, सागर भोसले, अभिजित गावंडे, संदीप गावंडे, कैलास वालदे, प्रदीप कुचनकर, शुभम बहादुरे यांनी केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Matru Vandana Scheme: सरकारची खास योजना! गरोदर महिलांना मिळतात ११,००० रुपये; योजनेत अर्ज कसा करावा?

Pune : पुणे पोलिसाची हेराफेरी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना हात आखडता, १०५ जणांसाठी फक्त ३० बुके?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज त्र्यंबकेश्वरमध्ये सभा

Bread Pakoda Recipe: सकाळी नाश्त्याला कुरकुरीत ब्रेड पकोडा झटपट कसा बनवायचा?

Shukra Gochar: पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला शुक्र बनवणार मालव्य राजयोग; या राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

SCROLL FOR NEXT