सचिन बनसोडे
श्रीरामपूर (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात आज शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्यावतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. दिल्लीच्या (Farmer) शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात (Ahmednagar) आला असून या मोर्चात शेकडो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. (Breaking Marathi News)
शेती मालाला हमीभाव देण्याचा कायदा केला जावा. (Shrirampur) स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाव्यात. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी; यासारख्या मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या. याशिवाय शेतकऱ्यांसाठी दिल्लीत संघटना व शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्यावतीने आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रांत कार्यलयावर धडक
नेवासा ते श्रीरामपूर असा ४० किमीचा प्रवास करत हे आंदोलक शेतकरी श्रीरामपूर प्रांत कार्यालयावर धडकले. या मोर्चात गावागावातून शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह या सहभागी झाले होते. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.